India vs south africa 3rd t20 live match updates cricket score today 04 october 2022 avw 92


India vs South Africa 3rd T20 Match Live Updates, 04October 2022: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात भारतीय संघ आजचा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल. टी२०विश्वचषकापूर्वी हा टीम इंडियाचा शेवटचा सामना असणार आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या पॉवर प्ले नंतर दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. कर्णधार टेम्बा बावुमाला उमेश यादवने बाद केले. क्विंटन डी कॉकची शानदार फलंदाजी सुरु असताना त्याला दुसऱ्यांदा जीवदान मिळाले. सिराजने त्याचा झेल सोडला. रिले रॉसो आणि डी कॉक यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. त्याने ३३ चेंडूत ५३ धावा करत स्वतःचे ही अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला दुसरा मोठा धक्का बसला. क्विंटन डी कॉक ४३ चेंडूत ६८ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरने त्याला धावबाद केले. शेवटच्या सामन्यात रिले रॉसोने शानदार शतक पूर्ण करत ४८ चेंडूत १०० धावा केल्या. त्याच्या या शतकाने दक्षिण आफ्रिकने २०० धावांचा टप्पा पार केला असून भारतासमोर विजयासाठी २२८ धावांचे आव्हान ठेवले आहे.

Advertisement

भारतीय संघाची धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्मा भोपळाही न फोडता तंबूत परतला. विराटच्या जागी श्रेयस अय्यरला स्थान मिळाले होते पण त्याचा फायदा मात्र त्याला उठवता आला नाही.

Live Updates

Advertisement

India vs South Africa Live Score Today, 04 October 2022 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी टी२० लाइव्ह मॅच अपडेट

Advertisement

India vs South Africa Live Score Today, 04 October 2022 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी टी२० लाइव्ह मॅच अपडेट

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात भारतीय संघ आजचा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.

Advertisement





Source link

Advertisement