India vs South Africa 2nd Test : भेदक गोलंदाजी करत शार्दुलकडून ७ विकेट, मात्र दक्षिण अफ्रिकेच्या आघाडीने भारतासमोर आव्हान


भारत आणि दक्षिण अफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने भेदक गोलंदाजी केली.

Advertisement

India vs South Africa Test Match Score 2nd Test Day 2: भारत आणि दक्षिण अफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने भेदक गोलंदाजी केली. शार्दुलने या इनिंगमध्ये एकूण ७ विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेचा संघही मैदानात पाय रोवून उभा आहे. अफ्रिकेने २२९ धावा करत भारताच्या २०२ धावांचा टप्पा ओलांडला. यासह अफ्रिकेने २७ धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतासमोर पुढील इनिंगमध्ये मोठी धावसंख्या उभी करून सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे.

३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना जोहान्सबर्गच्या वांडरर्स मैदानावर खेळला जात आहे. आज (४ जानेवारी ) खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकेने १८ षटकांमध्ये एक विकेट गमावत ३५ धावा केल्या होत्या.

Advertisement

हेही वाचा : India vs South Africa 2nd Test Day 1: पहिल्या दिवशी भारताचा संपूर्ण संघ २०२ धावांवर बाद, दक्षिण अफ्रिकेलाही एक झटका

भारतीय कसोटी संघ

के. एल. राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्वीन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), मोहम्मद सिराज

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source link

Advertisement