India Vs South Africa 2nd Test: तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु, पुजारा-अजिंक्य रहाणे मैदानातभारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न आहे. तर दक्षिण अफ्रिका हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २०२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिका संघाने सर्वबाद २२९ धावा केल्या आणि २७ धावांचा लीड घेतला. दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा २ गडी गमवून ८५ धावा केल्या. आता भारताकडे ५८ धावांची आघाडी आहे.

भारतीय संघ- केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर. अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

दक्षिण अफ्रिकेचा संघ- डीन एल्गर, एडन मारक्रमस किगन पीटरसन, रस्सी वॅन दर दुस्सेन, टेम्बा बवुमा, कायल वेरेयन, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, ड्युअन ऑलिविअर, लुंगी एनगिडी

Advertisement

The post India Vs South Africa 2nd Test: तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु, पुजारा-अजिंक्य रहाणे मैदानात appeared first on Loksatta.

Source link

Advertisement