मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी रेल्वेने बनवले आहे विशेष टूर पॅकेज

Image Source: Google Images

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवासी बुकिंग वाढवण्यासाठी आयआरसीटीसीने अलीकडेच गुजरात मध्ये मुंबई ते वडोदरा आणि अहमदाबाद विशेष टूर पॅकेजेसची घोषणा केली आहे.

वृत्तानुसार आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर राहुल हिमालियन यांनी सांगितले की, “या पॅकेजेसच्या पॅकेज किंमतीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यांची किंमत सुमारे २००० रुपये इतकी असेल अशी शक्यता आहे.”

Advertisement

हे टूर पॅकेजेस ३ रात्री/४ दिवस आणि ४ रात्री/५ दिवसाचे असतील. हे पॅकेज अहमदाबाद आणि वडोदरा आणि त्याच्या आसपास ऐतिहासिक, विदेशी आणि सांस्कृतिक स्थाने तसेच केवडियामधील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत टूर कव्हर करतील.

पर्यटकांना तीन किंवा चार तारांकित हॉटेलमध्ये सामावून ठेवण्यात येईल. याशिवाय पर्यटनस्थळे पाहण्यासाठी साठी वाहने उपलब्ध करुन दिली जातील.

Advertisement

कोरोना वायरसमुळे झालेल्या लाॅकडाऊन नंतर जवळजवळ सात महिने मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस निलंबित झाली आणि १७ ऑक्टोबरला पुन्हा सुरू झाली.

७०० हून अधिक सीट मिळवणारी तेजस एक्स्प्रेस या सध्या सुरू असलेल्या महामारीमुळे केवळ २५ ते ४० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. याव्यतिरिक्त, रेल्वे प्रवासादरम्यान केवळ सोशल डिस्टंसिंग आणि इतर सुरक्षिततेचे नियम राखण्यासाठी आयआरसीटीसीने ट्रेन मध्ये केवळ ६० टक्के जागा उपलब्ध ठेवली आहे.

Advertisement

दरम्यान, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेसचे रेल्वे वेळापत्रक निवडक मंगळवारी मार्च २०२१ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here