IND vs SA FINAL Test : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन, मॅचची वेळ, हवामान आणि…; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर!दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील कसोटी (SA vs IND) मालिका निर्णायक वळणावर आहे. उद्या ११ जानेवारी मंगळवारपासून केपटाऊनमध्ये दोन्ही संघांमधील अंतिम कसोटी सामना सुरू होणार आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला असून मालिका सध्या बरोबरीत आहे. विराट कोहलीचे पुनरागमन भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. कोहली शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही आणि केएल राहुलने संघाचे कर्णधारपद स्वीकारले.

Advertisement

मधल्या फळीतील फलंदाजी हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. पुजारा आणि रहाणे यांच्याशिवाय ऋषभ पंतच्या फलंदाजांनीही मौन बाळगले आहे. मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाजी भारतीय संघासाठी आवश्यक ठरते. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्करामचा फॉर्म खराब राहिला आहे. दुसरा सलामीवीर आणि कर्णधार डीन एल्गरने चांगली कामगिरी केली आहे. टेंबा बावुमाने मधल्या फळीत संघाची धुरा सांभाळली आहे. केपटाऊनमध्ये भारताचा रेकॉर्ड खराब राहिला आहे. त्यामुळे हा सामना सोपा होणार नाही. मोहम्मद सिराज हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत त्याच्या जागी संघात बदल करावा लागेल. दोन्ही संघांसाठी हा करा किंवा मरोचा सामना असेल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका – डीन एल्गर (कर्णधार), काइल वेरेन, टेंबा बावुमा, एडन मार्कराम, रुसी व्हॅन डर ड्युसेन, कीगन पीटरसन, मार्को जानसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी

Advertisement

भारत – विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर.

हेही वाचा – IND vs SA : ‘‘धोनी म्हणाला होता, की…”, कॅप्टन कूलचा ‘तो’ सल्ला विराटनं आजही ठेवलाय लक्षात!

Advertisement

खेळपट्टी आणि हवामान

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. नंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असू शकते. मात्र, त्यावर नेहमीच गवत असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत होईल. हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

कुठे पाहता येणार सामना?

भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. हॉटस्टारवरही हा सामना लाइव्ह पाहता येणार आहे.

Advertisement

The post IND vs SA FINAL Test : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन, मॅचची वेळ, हवामान आणि…; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर! appeared first on Loksatta.

Source link

Advertisement