IND vs SA: “हा जबरदस्त कर्णधार आहे फक्त..”; ऋषभ पंतने एल्गर आणि दुसानला मारलेले टोमणे स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड


पाच-सहा चेंडूं खेळल्याननंतर त्याचा बॅटिंग गार्ड कुठे आहे हे त्याला कळत नाही, असा टोला पंतने लगावला

Advertisement

जोहान्सबर्गमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये जोरदार वादावादी झाली. कर्णधार केएल राहुल, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर, रॅसी वेंडर डुसेन, जसप्रीत बुमराह आणि मार्को जॅन्सेन यासारख्या खेळाडूंमध्ये शाब्दीक युद्ध झाले. जोहान्सबर्ग कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतही दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंवर मजेशीर कमेंट करताना दिसला आणि त्याच्या कमेंट्स स्टंप माइकमध्ये कैद झाल्या आहेत. पंतने दुसान आणि कर्णधार एल्गर या दोघांनाही फटकारले.

फलंदाजीदरम्यान दुसान आपला बॅटिंग गार्ड सेट करत होता, तेव्हा पंत विकेटच्या मागून म्हणाला, ‘पाच-सहा चेंडूं खेळल्याननंतर त्याचा बॅटिंग गार्ड कुठे आहे हे त्याला कळत नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि त्याला ते माहीतही नाही, असे पंतने म्हटले. यानंतर पंतने कर्णधार एल्गरला टोमणा मारला आणि, “तो एक महान कर्णधार आहे, तो फक्त स्वतःचा विचार करतो,” असे म्हटले.

Advertisement

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा एल्गर आणि दुसान नाबाद परतले. एल्गर ४६ आणि दुसान ११ धावांवर खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेने दोन बाद ११८ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी १२२ धावांची गरज आहे. तर भारतीय संघाला मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्यासाठी आठ विकेट्स घ्याव्या लागतील.

“फॉर्म तात्पुरता आहे पण…”; सुनील गावस्कर यांच्या टीकेला चेतेश्वर पुजाराने दिले उत्तर

Advertisement

दरम्यान, भारतातर्फे अजिंक्य रहाणे (७८ चेंडूंत ५८ धावा) आणि चेतेश्वर पुजारा (८६ चेंडूंत ५३ धावा) या संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडूंनी बुधवारी अर्धशतकी खेळी साकारून स्वत:ची कारकीर्द वाचवण्यासह भारतालाही सावरले. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी केल्यामुळे दुसरा कसोटी क्रिकेट सामना निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे.

जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स मैदानावर सुरू असेल्या या कसोटीतील तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या डावात शार्दूल ठाकूरने एडिन मार्करमला (३१), तर रविचंद्रन अश्विनने कीगन पीटरसनला (२८) पायचीत पकडले. कर्णधार डीन एल्गर (खेळत आहे ४६) मात्र एक बाजूने तग धरून असून त्याच्या साथीला रॅसी व्हॅन दर दुसेन ११ धावांवर खेळत आहे. त्यामुळे चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट झाले असूून आफ्रिका उर्वरित १२२ धावा करणार की भारताचे गोलंदाज शिल्लक आठ बळी गारद करून ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source link

Advertisement