IND vs NZ Test: राहुल द्रविड येताच भारतीय संघात खंडीत झालेली ‘ती’ परंपरा पुन्हा सुरु; कौतुकाचा वर्षाव


IND vs NZ Test: संघात नव्या भिडूचं स्वागत करण्याची ती परंपरा द्रविड सरांनी पुन्हा केली सुरु

Advertisement

IND vs NZ Test: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड प्रशिक्षकपदी आल्यापासून क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कोणताही गाजावाजा न करता संयमपणा राखत खेळाडूंमधील प्रतिभा ओळखणारा राहुल द्रविड भारतीय संघाला वेगळ्या उंचीवर नेईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. न्यूझीलंडविरोधातील टी-२० मालिक जिंकत राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली आहे. दरम्यान आता कानपूरमधील कसोटी सामन्यासोबत राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाचीही कसोटी लागणार आहे.

IND vs NZ: कसोटीत मालिकेत श्रेयस अय्यरचे पदार्पण, सुनील गावस्करकांडून मिळाली कॅप; खास क्षण कैमेऱ्यात कैद

Advertisement

दरम्यान कानपूरमधील कसोटी सामन्याआधी राहुल द्रविडने असं काही केलं की ज्याचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे. कानपूर कसोटी सामन्यात भारतीय संघात श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. यासोबतच श्रेयस अय्यरने कसोटीमध्ये पदार्पण केलं आहे. मैदानात लिटिल मास्टर सुनील गावसकरांनी श्रेयस अय्यरला डेब्यू कॅप दिली. अशाप्रकारे राहुल द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूंच्या हस्ते नव्या खेळाडूंना डेब्यू कॅप देण्याची पंरपरा पुन्हा एकदा सुरु केली आहे.

हर्षलला आगरकडने दिली होती डेब्यू कॅप

याआधी भारतीय संघाने न्यूझीलंडविरोधात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली आहे. या मालिकेत भारताने तिन्ही सामने जिंकत न्यूझीलंडचा दारुण पराभव केला. या मालिकेत जलद गोलंदाज हर्षल पटेलने पदार्पण केलं होतं. तेव्हा राहुल द्रविडने माजी गोलंदाज अजित आगरकरच्या हस्ते हर्षलला डेब्यू कॅप दिली होती.

Advertisement

बंद झाली होती परंपरा –

माजी दिग्गज खेळाडूंच्या हस्ते युवा खेळाडूंना डेब्यू कॅप देण्याची परंपरा ऑस्ट्रेलियात आहे. हीच परंपरा भारतातही आहे. मात्र गेल्या काही काळापासून ही परंपरा खंडीत झाली होती. गेल्या काही काळापासून संघातील वरिष्ठ खेळाडू किंवा स्टाफ सदस्य डेब्यू करणाऱ्या खेळाडूला टोपी देत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Advertisement



Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here