IND vs NZ 1st : भारताला पहिला धक्का; काईल जेमसनने मयंक अग्रवालला पाठवले परतभारतीय क्रिकेट संघ आजपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यातून श्रेयस अय्यर भारताकडून कसोटी पदार्पण करत आहे. भारताचा डाव सुरू झाला असून मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी सध्या क्रीजवर आहेत.

Advertisement

न्यूझीलंडच्या संघात टॉम लॅथम, विल यंग, ​​केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), रचिन रवींद्र, टिम साउथी, एजाझ पटेल, काइल जेमिसन, विल्यम सोमरविले यांचा समावेश आहे.

तर भारतीय संघात शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव यांचा समावेश आहे.

Advertisement

सामन्याच्या तिसऱ्या षटकात शुभमन गिल बाद होण्यापासून बचावला. टीम साऊदीचा चेंडू त्याच्या पॅडवर आदळला आणि अपीलवर अंपायरने त्याला आऊट दिला. पण गिलने डीआरएस घेतला आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय भारताच्या बाजूने आला.

त्यानंतर आठव्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. मयंक अग्रवाल काईल जेमसनचा बळी ठरला. मयंकने २८ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १३ धावा केल्या. सध्या चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल ही जोडी क्रीझवर आहे.

Advertisement

The post IND vs NZ 1st : भारताला पहिला धक्का; काईल जेमसनने मयंक अग्रवालला पाठवले परत appeared first on Loksatta.Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here