Ind vs Nz सामन्यासाठी टीव्हीसमोर बसण्याची गरज नाही, प्रवासात किंवा ऑफिसमध्येही पाहता येईल मॅच


नेपियर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेतील शेवटचा सामना आज नेपियर येथे होणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला होता. आता भारताने तिसरी टी-२० जिंकली तर ही मालिकादेखील भारतीय संघ जिंकणार आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत पाहुण्या संघाचे नेतृत्व करत आहे, तर शिखर धवनकडे वनडेची जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement

भारतात कोणते चॅनलवर सामना प्रसारित केला जाईल (Which channel telecast IND vs NZ match?)

स्टार स्पोर्ट्स किंवा सोनी स्पोर्ट्स या दोघांनाही न्यूझीलंड क्रिकेट संघाचे घरगुती सामने प्रसारित करण्याचा अधिकार नाही. मालिकेचे थेट प्रक्षेपण करणारे दूरदर्शन स्पोर्ट्स हे भारतातील एकमेव टीव्ही चॅनल आहे. टीम इंडियाचे चाहते वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्याप्रमाणेच ही मालिका डीडी स्पोर्ट्सवर थेट पाहू शकतील.

ज्याप्रमाणे स्टार स्पोर्ट्सच्या वाहिनीवर हे सामने पाहता येणार नाहीत त्याचप्रमाणे हे सामने हॉटस्टार किंवा सोनी या अपवर डॆहील हे सामने पाहता येणार नाहीत. आजचा हा निर्णायक भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईमवर पाहता येईल.

Advertisement

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक (भारतीय वेळ)
तिसरा टी-२० सामना : २२ नोव्हेंबर, दुपारी १२ वाजता, मॅक्लीन पार्क, नेपियर
पहिला एकदिवसीय सामना : २५ नोव्हेंबर, सकाळी ७ वाजता, ऑकलंड
दुसरी एकदिवसीय सामना : २७ नोव्हेंबर, सकाळी ७ वाजता, हॅमिल्टन
तिसरी एकदिवसीय सामना : ३० नोव्हेंबर, सकाळी ७ वाजता, क्राइस्टचर्च

संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत:
इशान किशन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

Advertisement

न्यूझीलंड:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), ईश सोधी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन.Source link

Advertisement