IND vs NZ: कसोटीत मालिकेत श्रेयस अय्यरचे पदार्पण, सुनील गावस्करकांडून मिळाली कॅप; खास क्षण कैमेऱ्यात कैद


श्रेयसला कसोटी सामन्याआधी भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी कॅप दिली. या क्षणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Advertisement

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूरमध्ये सुरू झाला आहे. टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरसाठी हा सामना खास आहे. कारण या सामन्याद्वारे तो कसोटी करियरमध्ये पदार्पण करत आहे. श्रेयस अय्यरच्या पदार्पणाच्या कसोटीत त्याला भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी कॅप दिली. २६ वर्षीय श्रेयस हा भारताचा ३०३ वा कसोटीपटू आहे.

श्रेयस अय्यर झाला भावूक

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये माजी कर्णधार सुनील गावस्कर श्रेयस अय्यरला कसोटी कॅप देत आहेत. यादरम्यान टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार अजिंक्य रहाणेसह इतर खेळाडूही तेथे उपस्थित होते. गावस्कर यांनी श्रेयसला पदार्पणाची कॅप देताच तो भावूक झाला.

Advertisement

( हे ही वाचा: बाल्कनीत कपडे सुकवण्याच्या नादात वृद्ध महिला १९व्या मजल्यावरून पडली; थरारक दृश्य कैमेऱ्यात कैद )

( हे ही वाचा: Viral video: मांजरीच्या पिल्लावर अचानक तीन वाघांनी केला हल्ला, आणि… )

Advertisement

अय्यर २०१७ पासून खेळत आहे

श्रेयस अय्यर २०१७ पासून मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये भारताकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत मर्यादित फॉरमॅट अंतर्गत ५४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने १३९३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची एकदिवसीय सामन्यांमध्ये सरासरी ४२.७ तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २७.६ अशी होती. श्रेयसचे प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. यापूर्वी तो दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर होता. आयपीएल २०२० त्याच्यासाठी खूप यशस्वी ठरला ज्यामध्ये त्याने शानदार फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्ससाठी ५१९ धावा केल्या.

( हे ही वाचा: Viral Video: ट्रेनमध्ये मिळाली नाही जागा म्हणून जुगाड करत चक्क बनवली स्वतःची सीट! )

Advertisement

विराटला दिली विश्रांती

कामाचा ताण पाहता टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला कानपूर कसोटीपर्यंत विश्रांती देण्यात आली आहे. मुंबई कसोटीत तो टीम इंडियात सामील होणार आहे. यामुळेच तो न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळू शकला नाही. केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र श्रेयस अय्यरने बाजी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here