HP ने सादर केला नवीन कन्व्हर्टीबल लॅपटॉप – जाणून घ्या काय आहेत फीचर्स

HP Laptop
Image Source: Google Images

HP Pavilion x360 लॅपटॉप
एचपी कंपनीने आपल्या पॅव्हिलॉन x360 या नवीन कन्व्हर्टीबल लॅपटॉपला भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे, ज्याला अनेकांची पसंती मिळत आहे. विशेष करून विद्यार्थी तसेच ऑफिशियल कामासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. कारण यात लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. याची डिझाईन ही अतिशय आकर्षक आहे. याचे वजन अवघे १.६८ किलो इतके असल्यामुळे तो कुठेही सहज पणे वापरता येऊ शकतो. या लॅपटॉप मध्ये १४ इंच चा १९२०x१०८० पिक्सेलस असलेला टच स्क्रीन फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

लॅपटॉप बघण्यासाठी येथे क्लिक करा

Advertisement

Pavilion x360 लॅपटॉप चे फिचर्स
HP Pavilion x360 ह्या लॅपटॉप मध्ये intel i5 आणि i7 या प्रोसेसरचे पर्याय देण्यात आले आहेत. यात इंटेलच्या ऑप्टेन मेमरी या टेक्नॉलजी चा वापर करण्यात आल्या मुळे प्रोसेसींगचा वेग जवळपास २८ टक्क्यांनी वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. लॅपटॉप ला ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे. याला एनव्हिडीयाच्या ग्राफीक प्रोसेसर पण जोडण्यात आले आहे. तसेच लॅपटॉप फास्ट चार्जींग देखील सपोर्ट करतो, एकदा चार्ज केल्यानंतर ११ तासांचा बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच या लॅपटॉप मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा देखील देण्यात आली आहे.

काय असू शकते किंमत?
याच्या विविध व्हेरियंटची किंमत ५०,३४७ रूपयांपासून सुरू होणार आहे. हे लॅपटॉप ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही ठिकानांवरून खरेदी करता येणार आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here