हाँगकाँग मध्ये एअर इंडिया कंपनीच्या विमानांवर बंदी

Image source: Google Images

एअर इंडिया मार्गे हॉंगकॉंगला जाणाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे कारण भारतीय विमान कंपन्यांना हाँगकाँगने १४ दिवसांच्या कालावधीसाठी ३ डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे.

हाँगकाँग अधिकाऱ्यांनी फ्लाईट्स वर तेव्हाच बंदी घालतात जेव्हा एखाद्या विमानातून सर्व प्रवाशांपैकी किमान पाच प्रवासी कोविड-१९ पॉझिटिव्ह सापडतात. नियम सर्व एअरलाईन्ससाठी एकसमान आहे.

Advertisement

यापूर्वी, याच कारणास्तव व्हिस्ताराला हाँगकाँगने बंदी देखील घातली होती. एअर इंडियाला यापूर्वी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये हाँगकाँगला उड्डाण करण्यास मनाई होती.

यावर बोलतांना एअर इंडियाच्या एक अधिकारऱ्यांनी असे म्हटले आहे की “सर्व आवश्यक खबरदारी एअरलाइन्सकडून घेतली जात आहे आणि सर्व प्रवाश्यांसाठी कोविड निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य आहे.”

Advertisement

कोविड-१९ च्या दोन चाचण्यांमध्ये साधारणत: ७२ तासांचे अंतर असते, यामुळे दुसऱ्या चाचणीच्या निकालाची शक्यता वाढते. अशाच प्रकारे एअर इंडियाचा असा विश्वास आहे की त्यांच्याकडून सुरक्षिततेची कोणतीही चूक नाही झाली.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here