HDFC Bank : एचडीएफसी बँकेकडून ग्राहकांना महत्त्वाची सूचना, सावध करत म्हटले…


Advertisement

HDFC Bank : देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीने आपल्या बँकेच्या ग्राहकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. एचडीएफसी बँकेने अधिकृत ट्वीटर हँडलवर ट्वीट करत पॅन कार्ड डिटेल्स अपडेट करणाऱ्या लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. 

एचडीएफसी बँकेने ट्वीट करत ग्राहकांना म्हटले की, एका बोगस एसएमएस पाठवण्यात येत आहे. एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांकडून गोपनीय माहिती एसएमएसद्वारे देण्यास सांगत नाही अथवा कोणत्या लिंकवर क्लिक करून माहिती देण्यास सांगितले. बँकेने म्हटले की, बँकेकडून ग्राहकांना अधिकृत क्रमांक 186161  अथवा HDFCBK/HDFCBN या आयडीच्या मार्फत मेसेज पाठवले जातात. एचडीएफसी बँकेने म्हटले की, एसएमएस हा ऑफिशियल डोमेन hdfcbk.io वरून येईल. त्याशिवाय इतर कोणत्याही डोमेनवर क्लिक करू नये असेही आवाहन बँकेने ग्राहकांना केले आहे. 

Advertisement

 

हॅकर्सकडून ग्राहकांकडून फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर एचडीएफसी बँकेने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

Advertisement

वैयक्तिक माहिती शेअर करू नका

दरम्यान, कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. त्याशिवाय, ऑनलाइन खरेदी करताना तुमची वैयक्तिक माहिती जसे की नेट बँकिंग पासवर्ड, UPI पिन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तपशील इत्यादीसारख्या बँकिंग तपशील कधीही शेअर करू नका. कोणत्याही शॉपिंग वेबसाइटवर खरेदी करताना विशेष काळजी घ्या की, कोणत्याही कंपनीची ग्राहक सेवा तुम्हाला कधीही बँकिंग तपशील मागत नाही. अशातच वैयक्तिक माहिती मागणाऱ्यांपासून सावध रहा असा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला गेला आहे. 

Advertisement

इतर महत्त्वाच्या बातम्या:

HDFC Bank : HDFC Bank ग्राहकांना झटका, आजपासून EMI महाग; जाणून घ्या नवे दर

Advertisement

 

Advertisement





Source link

Advertisement