गोवा देशातील पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या काय आहेत प्रवासाचे नियम

Goa open for Tourism
Image Source: Outlook India

कोविड-१९ च्या लॉकडाऊन नंतर गोवा राज्य पर्यटकांसाठी पुन्हा उघडले आहे. पर्यटन संचालक मेनिनो डिसोझा म्हणाले की, “राज्यचा 33% जीडीपी बहुतेक पर्यटनामधून येतो आणि यावर्षी सर्वात मोठा घटक देशांतर्गत पर्यटक असतील”.

प्रवासी गोव्या मध्ये येताना गाडी, फ्लाईट किंवा ट्रेन ने येऊ शकतात ज्या फक्त मडगाव, थिवीम आणि वास्को दा गामा या स्थानकावर थांबल्या जातील.

Advertisement

येत्या सोमवारपासून, सरकार एक मोहीम देखील सुरू करीत आहे जिथे पर्यटकांना थोडा वेळ मुक्कामासाठी भाड्याने दिलेली घरे पर्यटन विभागाच्या कक्षेत आणावी लागतील. आवश्यक पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेची तपासणी केली जाईल.

गोव्याला प्रवास करण्यापूर्वी काय करायचे आणि काय नाही हे पाहूया:

Advertisement

१. सोशल डिस्टंसींगच्या निकषांचे कठोरपणे पालन करा आणि अनावश्यक गोष्टींना स्पर्श न करण्याचा प्रयत्न करा.

२. कॅशलेस व टचलेस व्हा. कोरोना व्हायरस स्पर्शाने पसरतो आणि तो पैसे किंवा कॉईंस वर असू शकतो. आपण डिजिटली पेमेंट केले तर संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.

Advertisement

३. नेमकेच सामान घ्या – अधिका-यांनी सांगितल्यानुसार, शक्य तितके सामान मर्यादित ठेवा. आपल्याला फक्त एक चेक इन बॅग आणि एक केबिन बॅग सह प्रवास करण्याची परवानगी आहे, जेणेकरून आपण ट्रॉलीचा वापर टाळून सहजतेने प्रवास करू शकता.

४. सुरक्षिततेच्या सर्व खबरदारी घ्या. सुरक्षित प्रवास करून निरोगी घरी पोचण्यासाठी आणि कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी आपल्याला सर्व प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. योग्य स्वच्छता राखण्यासाठी मास्क, फेस शिल्ड, हातमोजे घाला आणि सॅनिटायझर सोबत ठेवा.

Advertisement

५. कर्मचार्‍यांना सहकार्य करा. पहिल्यांदाच आपण सर्वजण अनेक निर्बंध आणि मर्यादा पार करत आहोत. परंतु, आपण हे समजून घेतले पाहिजे की ते आपल्या फायद्यासाठी आहे. म्हणूनच, एक जबाबदार प्रवासी म्हणून, कर्मचार्‍यांशी सौम्य रहा आणि त्यांना प्रक्रियेत मदत करा.

६. जर आपला परिसर एखाद्या कंटेन्टमेंट झोन अंतर्गत असेल जिथे मोठ्या प्रमाणात कोविड-१९ केसेस असतील तर आपण प्रवास करणे टाळा.

Advertisement

७. रेलींग्स, आर्म-रेस्ट, हेडरेस्ट, स्विचेसना हात लावू नका ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

८. जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा कोविड-१९ ची लक्षणे वाटत असतील तर प्रवास करु नका किंवा कोविड-१९ ची चाचणी करून घ्या.

Advertisement

९. प्रवासा दरम्यान बस किंवा ट्रेन मध्ये वापरलेले मास्क किंवा हातमोजे तिथेच टाकू नका.

१०. प्रवास करताना मास्क काढू नका.

Advertisement

११. शक्यतो घरातील जेष्ठ नागरिक व लहान मुले ह्यांना सोबत घेऊन प्रवास करू नका.

शासनाच्या आदेशानुसार प्रवास करताना कोविड-१९ चे नियाम पाळा आणि निरोगी प्रवास करा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here