G20 चे भारताला आयोजकपद: PM नरेंद्र मोदींच्या सन्मानार्थ भाजप महिला मोर्चातर्फे G20 लोगोची रांगोळीसह विविध उपक्रम


नाशिक5 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात G -20 2023 चे अध्यक्ष पद आपला भारत भूषवित आहे. या गोष्टींच्या सन्मनार्थ रविवारी G-20 च्या लोगोची रांगोली काढून नाशिक भाजपा महिला मोर्चा सिडको मंडल 1 च्या वतीने नाशिक पश्चिम मतदार संघात विविध ठिकाणी रांगोळी काढण्यात आली.

Advertisement

याप्रसंगी आमदार सीमा हिरे म्हणाल्या, जी – 20 या जागतिक संस्थेचे अध्यक्ष पद पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाल्याने या निमित्ताने देशभरातील प्रमुख शहरांमध्ये या ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये जगातील मोठ्या देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व औरंगाबाद शहरांची निवड करण्यात आली आहे.

या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या प्रतिनिधींची आर्थिक नीती हवामान तापमान यास जागतिक स्तरावरच्या विषयांवर चर्चा होणार आहे या चर्चेमध्ये समस्या आणि त्यावरील उपाय योजना यांचे मंथन देखील होणार आहे. जागतिक स्तरावर जी – 20 निमंत्रक भारताला मिळाल्याने मोठ्या प्रमाणात सन्मानाची बाब आहे. या सन्मानाचे आपण भारतीय नागरिक म्हणून घटक असल्याने त्याचे सर्व स्तरात स्वागत करावे असे आवाहन या निमित्ताने त्यांनी केले.

Advertisement

या कार्यक्रमाचे आयोजन सिडको मंडळ- 1 च्या अध्यक्षा अर्चना दिंडोरकर व रांगोळी संयोजिका छाया परेवाल यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे आमदार सीमा हिरे, प्रदेश सचिव रोहिणी नायडू, नाशिक महानगर महिला मोर्चा अध्यक्षा हिमगौरी आडके, सरचिटणीस रश्मी हिरे, सोशल मीडिया प्रमुख स्वाती आडके, नगरसेविका छाया देवांग, शोभा सोनवणे, जयश्री धारणकर, कविता सोनार,प्रतिभा पाटील,भारती चौधरी, जयश्री देशमुख, रेखा लिंगायत,विदुला राजहंस, रुपाली सोनवणे आदींसह प्रभागातील महिला पदाधिकारी उस्थितत होत्या.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement