२६/११ रोजी मुंबई वर भयंकर दहशतवादी हल्ला झाला आणि यात १५ पोलीस, २ एन. एस. जी कमांडो आणि १४९ निष्पाप लोकांनी जिव गमावला. पहा नक्की काय आणि कसे झाले त्या दिवशी.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी १२ वर्षांपूर्वी पाकिस्तानकडून लष्कर-ए-तैयबचे दहा दहशतवादी समुद्री मार्गाने मुंबईला पोहोचले आणि सुमारे ६० तासांपर्यंत शहरात हल्ला करत होते आणि मुंबईत दहशत पसरवली. त्यांनी शहरात १८ सुरक्षा कर्मचार्यांसह १६६ जणांना मारले आणि अनेकांना जखमी केले.
ते पाकिस्तानच्या कराचीहून बोटीमार्गे मुंबईला आले. वाटेत त्यांनी मासेमारीच्या होडीला हायजॅक केले आणि चार क्रू मेंबर्सना ठार मारले आणि त्यांचे मृतदेह जहाजावर फेकले.
बोट कॅप्टनला मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचवायला सांगितले आणि किनाऱ्या जवळ पोहोचताच कॅप्टन चा गळा चिरून ठार मारले. गेट वे ऑफ इंडिया जवळ दहशतवाद्यांनी तीन गट गेले. हल्लेखोर स्वयंचलित शस्त्रे आणि ग्रेनेड वापरत होते.
पहिला हल्ला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन येथे झाला होता. यात ५८ लोक ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. दुसरा हल्ला नरिमन हाऊस मध्ये झाला.
त्यात त्यांनी ५ इस्त्राईली नागरिकांना मारले. या नंतर लोकप्रिय लिओपोल्ड कॅफेवर मध्ये जाऊन गोळीबार केला ज्यात १० जण ठार झाले. हल्ला १०-१५ मिनिट चालू होता. दहशतवाद्यांनी दोन टॅक्सींमध्ये ही बॉम्ब लावले ज्यात ५ जणांनचा बळी गेला आणि १५ जखमी झाले. मुंबईत रक्ताचे पाठ वाहू लागले होते.
यानंतर त्यांनी ताजमहाल पॅलेस हॉटेलला निशाण्यावर धरले. दोन दहशतवाद्यी हॉटेलच्या आत शिरले आणि गोळीबारासोबत ग्रेनेड फेकण्यास सुरुवात केली.
हॉटेल मध्ये कमांडो सैन्याने खोलीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. या वेळी लोकांनाची मदत करत असताना लष्कराचे मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले. तो पर्यंत ओबेरॉय-ट्रायडंट हॉटेलवर दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि लोकांवर गोळीबार केला.
सीएसटी रेल्वे स्थानकावर हल्ला केल्यानंतर कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान हे कामा रुग्णालयाकडे वळले. ते रुग्णालयाच्या मागील गेटवर आले, परंतु सतर्क रूग्णालयाच्या कर्मचार्यांनी सर्व दरवाजांना कुलूप लावले होते.
त्यानंतर या दोघांनी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह असलेल्या सहा पोलिसांवर रुग्णालयाबाहेर हल्ला केला आणि त्यांची जीप हायजॅक केली. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे, मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय साळसकर हे होते.
कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान यांना गिरगाव जवळ केलेल्या नाका बंदीत रोखण्यात आले. तिथून पळ काढत असताना त्यांच्यावर पोलीसांनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारात इस्माईल खानचा खातमा झाला पण कसाब जिवंत होता.
त्यानी तुकाराम ओंबळेंवर गोळ्या झाडल्या पण गोळ्या लागून सुद्धा त्यांनी अजमल अमीर कसाबला सोडले नाही जो पर्यंत बाकीच्या पोलीसांनी त्याला घेरले नाही. तो पर्यंत सुरक्षा दलांनी इतर ८ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन, ताजमहाल पॅलेस हॉटेल, कॅफे लिओपोल्ड, कामा आणि अल्बलेस हॉस्पिटल, नरिमन हाऊस आणि ओबेरॉय-ट्रायडंट हॉटेल यासारख्या मुंबईतील प्रमुख ठिकाणांवर दहशत पसरवण्यासाठी हल्ले केले.
चार वर्षांनंतर २१ नोव्हेंबर २०१२ रोजी येरवडा जेलमध्ये कसाबला फाशी देण्यात आली.