आम्ही जग थांबताना पाहिलं…

Image Source: Google

तुमच्या भविष्य काळाकडून…

इटालियन लेखिका Francesca Melandri यांनी “फ्रॉम युअर फ्युचर” म्हणून एक पत्र जगासाठी लिहिले, त्याचा क्षमा देशपांडे, विराज मुनोतयांनी केलेला मराठी अनुवाद तर अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने सादर केलेला व्हिडीओ सध्या इंटरनेट वर लोकप्रिय होत आहे. विचार करायला लावणारे ते पत्र आणि भावनांची जोड असलेले त्या पत्राचे वाचन हे थेट हृदयालाच हात घालते.

Advertisement

कोरोनामुळे जगभर मानवी आयुष्यावर कुठे कुठे आणि काय परिणाम झाले याचं हे पत्र बोचरं वर्णन करते. 

व्हिडीओ ची सुरुवात होतेच ती मुळात, हे आपल्याशी कस जुळत हे सांगणाऱ्या निवेदकाच्या धीरगंभीर निवेदनाने.

Advertisement

लेखिका इटली मधील रोम शहरात आहे. तीन आठवड्यापासून मृत्यूने तेथे थैमान घातलं आहे, सुरुवातीला आपल्याच आयुष्यात मग्न असणाऱ्या माणसाबद्दल लेखिका बोलते आणि इथूनच युरोप साठी लिहिलेलं ते पत्र भाषा आणि सीमेचे बंधन तोडत वैश्विक होत. ‘हे संकट सगळ्यांवरच आहे फक्त आमची वेळ आली आहे, वूहान आमच्या आधी यातून गेलं तेव्हा आम्ही तेच करतोय जे आज तुम्ही करताय, आणि आमचा वर्तमान काळ हाच तुमचा भविष्यकाळ असणार आहे.’  असा आशय असणारं हे पत्र इतर गोष्टींपलीकडे जाऊन मनाला हात घालते. बराच वेळा पर्यंत त्यातले हे शब्द आणि मुक्ता बर्वेचा आवाज डोक्यात घुमत राहतो.

त्यांच्यात आणि आपल्यात असलेले साम्य जस जसे पत्र पुढे वाचत जातो तसं अधिक जाणवायला लागते. जेव्हा लेखिका म्हणते आम्ही पण हेच करत होतो, जसे तुमच्याकडे आहेत तसे आमच्याकडे पण मत प्रवाह होते परिस्थितीचे गांभीर्य, सरकारचे नियम काटेकोर पणे पाळणारे आणि त्याला (आपल्या भाषेत) फाट्यावर मारणारे लोक होते… हे ऐकतांना गल्लीत क्रिकेट खेळणारी लहान – तरुण मुलं, संध्याकाळी पारावर जमणारी मध्यमवयीन, बाहेर चालून येतो, अस म्हणत हट्ट करणारी वृद्ध मंडळी, अकारण गजबजलेली मंडई, गाडी काढून गल्ली बोळातून चक्कर मारून येत परिस्थितीचा आढावा घेणारे तरुण, त्यांना समजावणारे इतर.असे सारे घडलेले क्षणात डोळ्यासमोर तरळून गेले. 

Advertisement

“ तुम्ही रोज घरी छान जेवाल, वेळेचा सदुपयोग कसा करायचा या बद्दल इंटरनेट वर शोधाल..” हे ऐकत असतांनाच ‘जेवायला ये’ हि आईची पहिली हाक पण आली. परत एकदा आपण आणि ते असा फरक आणखी कमी झालेला मनातच जाणवला. दोन आठवडे आपल्या कडे उलटून गेलेले, म्हणजे आपण फक्त एक आठवडा मागे चालत आहोत ह्याची धक्कादायक जाणीव झाली. वेगवेगळे छंद, पुस्तक यातून आता खरच मन लागेनासे झाले होते. ;सगळ्या सोशल मिडिया वर नकळत फारच सक्रीय झालेले मी आता समोर येणारी प्रत्येक गोष्ट आणि फक्त एक- दोन आठवडे आपल्या पासून पुढे असलेली इटली यांची तुलना करू लागले. आधी फक्त संशयित, बाधित आणि मृत आकड्या पर्यंत करत असलेली तुलना आता इतर ठिकाणी पण होवू लागली.. दूर असलेल्या घरच्यांचे फोन आठवले, तसे दोन आठवड्यात सर्वांशीच जवळ जवळ वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क झाला होता हे आठवले.. नाहीच काही तर बोलत जरी नसलो तरी ग्रुप वर टाकलेल्या त्यांच्या मिम्स वर मनापासून हसत रिप्लाय पण केला होता. NDTV  वरचे गावांचे, स्थलांतरितांचे, मजुरांचे फोटो आणखी भीतीदायक वाटत होते, घर नसलेले लोक काय करत असतील हा प्रश्न तसा आधी पण पडला होता. घरात प्रेम, भांडण यात वेळ जात तर होता, पण ह्या कठीण प्रसंगात आपण एकटे नाही ह्या जाणीवेने तसा थोडा दिलासा दिला. रस्ते अजून तरी भयावह झाले नव्हते, समोरून जाणारी भाजीची गाडी दिसत होती पण भविष्य काय असेल ह्या प्रश्नाने आताशा घेरलं होत.

“संस्कृतीचा विनाश ..” हे पुढचे मुद्दे ऐकताना हडप्पा, मोहेंजोदारो, रसातळाला गेलेल्या संस्कृती, समुद्रात बुडलेली द्वारका अशी खूप काही नावे आठवली ..आणि एका क्षणात सगळ खरच संपत असेल का ? कि इटली, अमेरिके सारखे मृत्यू घिरट्या घालत असेल आणि त्याच्या भितीने हतबल लोकांची गंमत पाहत.. हळूहळू मारत असेल, वाचण्याची फार संधी न देता ? आपल्याकडे नक्की काय होईल? आपण असू का? आणि आपण असलो तरी ज्यांच्यासाठी, ज्यांच्यावरून, ज्यांच्याशी भांडत होतो ते सगळे नीट राहतील ना? काही झालं तर? नकळत आता भावनिकतेने जागा घेतली होती, भीती एका कोपऱ्यात तिचे घर करत होती.. सगळ ठीक होवून जाईल अस म्हणणे आता कठीण वाटायला लागले होते.

Advertisement

जग पुन्हा पूर्वी सारखं कधीच राहणार नाही ह्या आशयावर व्हिडीओ तर संपला.

लेखिकेने म्हटल्या प्रमाणे प्रत्येकाच्याच हसण्यात निराशा कमी जास्त झळकतेय असे वाटले. मित्र-मैत्रिणीसोबत परत भेटल्यावर काय करायचे याचे नियोजन निरर्थक वाटू लागले.. भविष्यच नसलेल्या दिशेने वाटचाल करत आहेत का आपणही? उगाच ते आणि आपण यातले साम्य शोधणार मन आपण किती वेगळे आहेत ह्याचा भाभडेपणाने शोध घेत होते. अनेकांबद्दल मत विचार करण्याने बदलू लागली होती, पर्यावरण, निसर्ग, हे आपल्याकडे पहिल्या आठवड्यातच घडले, दुसरा आठवडा आर्थिक विवंचनेत गेला, आणि तिसरा आठवडा थोड्या आशा पल्लवित करण्यात.. पुन्हा लॉकडाऊन वाढलं तर काय होईल.. खरच आपण पण या अनिश्चित भविष्याचा भाग आहोत. हतबल आहोत हे कोपऱ्यात घर करू लागलं आहे. त्यांचा पण दुसरा –  तिसरा आठवडा असाच होता नाही का ? 

Advertisement

अर्थव्यवस्था, जागतिक राजकारण, करिअर ह्या तावातावाने बोलत असलेल्या गोष्टी आज अत्यंत दूरच्या किंवा जगण्याशी असंबद्ध आहेत का अस उगीच वाटल. जगण्याच्या .. ‘Survival’ ह्या मूळ तत्वाकडे आपली  वाटचाल सुरु झाली हे मात्र अंतिम सत्य वाटत होत. कोणी, का अन कसे? जग ह्या परिस्थितीत अडकले यावर चालू असलेल्या वादांच्या उत्तरांपेक्षा आता जगायचं हे महत्वाचं वाटत होत. लेखिकेने त्यांच्या साठी वापरलेला भूतकाळ वेळ निसटल्याच प्रतिक होत.. तर आपला वर्तमान त्याच दिशेने जातोय का याचा तिचे फिरणारे शब्द वेध घेत होते.

जग पूर्वी सारख नक्कीच राहणार नाही, धर्म, जात आणि वर्ण या भेदांपेक्षा आपण माणूस आहे कदाचित हे हळूहळू विसरत चाललेले सत्य पुन्हा रुजू लागेल. आर्थिक व राजकीय हितांचे समीकरण पुन्हा बदलतील, सगळ सुरळीत होईल, हा विनाश इतिहासातील एक घटना बनेल फक्त. त्याच्या जखमा मात्र व्रण बनून पुढील कित्येक वर्ष आठवण देत राहतील. काय काय गमावलं हे तर पुढचा काळ सांगेल, त्यातून पुढे कस जायचं हे भविष्यात असणारे लोक ठरवतीलच, पण आज काय? आज आपल्याला हे ठरवायचं आहे कि आता सध्या यातून बाहेर यायला काय करायचं? भविष्य जरी अनिश्चित असले तरी वर्तमानाने इतर देशांपेक्षा भारताला थोडी अधिक संधी वेळे बाबत दिली हे मात्र खरे. त्याचा उपयोग करून तरी “आपण आणि ते” हा फरक व्हावा असे वाटते. एकमेकाला आधार द्यायला, सगळे एक आहोत, सोबत आहोत हे सांगायची कदाचित काल पर्यंत गरज नव्हती वाटत पण ते कृतीत दिसावं.. ‘घरातच राहूया, कोरोनाला टाळूया’, सरकार व इतर यंत्रणांना आपल्याला यातून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करूया. आशेचा एक किरणच कोरोनाने ग्रासलेल्या जगाला जगण्याचे निमित्त देत आहे.

Advertisement

“ माहित आहे मला, माझे भविष्य अनिश्चित आहे, 

उद्याची शक्यता कदाचित दिवसेंदिवस धूसर होईल,

Advertisement

मन खचवणारे खूप घडेल, खूप स्वप्न मी पहिली होती,

अनेक प्रश्नांना समोर जायची मी तयारी पण ठेवली होती,

Advertisement

इन्शुरन्स, बँक बलन्स, सगळ्या भविष्याची तरतूद होती,

आणि आता भविष्य दिसत नाहीये.. 

Advertisement

पण मला आशेचा एक किरण दिसतोय, 

जे वाचवण्यासाठी धडपडत आहे त्यांच्या प्रयत्नातून

Advertisement

जे जगण्यासाठी झुंजत आहे त्या जगभरातील लोकांकडून,

उद्या काय खाणार? ह्या छोट्या प्रश्नातून..

Advertisement

माहित नाही, 

रस्ता किती मोठा आहे.. कोण सोबत असेल शेवटा पर्यंत

Advertisement

पण मी फक्त आजचा दिवस पहायचं ठरवलेय,

उद्या पुन्हा उठण्यासाठी.. 

Advertisement

आज घरात राहायचं आहे.. 

उद्या पुन्हा मोकळ्या आकाशाखाली जमून 

Advertisement

आम्ही सगळे कसे लढलो, ह्या युद्धाची गोष्ट सांगण्यासाठी.”

पहिल्या महायुद्धातील शहीद सैनिकांचे हंगेरीतील स्मारक

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. तुमच्या कडे जर interesting लेख असतील तर आम्हाला [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here