इथपासून पुण्याचा उल्लेख ‘कसबे पुणे’ होवू लागला…

Image Source: Google Images

      मुस्लिम राजे आणि पुणे

१३ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यावर यादव घराण्याचा राजा रामदेव हा राज्य करीत होता. हा या घराण्याचा शेवटचा राजा होय. इ.स. १२९४ ला अल्लाउद्दीन खिलजीने हा मुलुख जिंकून आपल्या ताब्यात घेतला. या काळात बरया अरबाने चाकणला किल्ला बांधुन तेथुन पुण्याचा कारभार चालविण्यास सुरवात केली या काळात अनेक मुस्लिम फकीर पुण्यात आले. मुस्लिमांची वस्ती पुण्यात वाढू लागली व याच काळात पुण्याचा ‘कसबे पुणे’ असा उल्लेख होऊ लागला. 

Advertisement

      पुढे इ.स. १३२० साली महम्मद तघलखाने खिलजी सुलतानकडुन पुणे प्रांत जिंकून घेतला. पण त्याला फार काळ इथे राज्य करता आले नाही. इ.स. १३४७ ला तघलखाचाच सरदार हसन कांगो बहामनीने बंडाचे निशान उभारले व येथून बहामनी काळ सुरु झाला. जवळ जवळ एक शतकभर बहामनी राजांनी आपला चांगला अंमल या  प्रांतात बसविला. परंतु पुढे १४८१ नंतर बहामनींचा वाईट काळ सुरु झाला. या बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. विजापुर ची आदीलशाही व अहम्मद नगर ची निजाम शाही हे त्यापैकी दोन तुकडे होत. इ.स. १४९० साली ही दोन राज्ये स्थापन झाली. यावेळी पुणे प्रांत हा प्रथम निजामशाहीच्या अंमलाखाली गेला. 

Advertisement