former england captain Michael Vaughan advised virat kohli who is struggling for his formआयपीएलच्या पंधराव्या पर्वात विराट कोहली खास कामगिरी करु शकला नाही. फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर तो तीन वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. त्याच्या याच खराब फॉर्मनंतर चिंता व्यक्त केली जात असताना इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने विराट कोहलीला मोलाचा सल्ला दिला आहे.

Advertisement

हेही वाचा >> Video : चेन्नईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर युवराज सिंगने घेतली सुरेश रैनाची फिरकी, खास व्हिडीओ व्हायरल

खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी विराटने काय करायला हवं हे मायकेल वॉनने सांगितलं आहे. “विराट कोहलीला भूतकाळात डोकावण्याची गरज आहे. त्याने क्रिकेट खेळायला का सुरुवात केली, याचा त्याने विचार करायला हवा. बंगळुरुचा कर्णधार फॅफ डू प्लेसीसने विराट कोहलीशी चर्चा केली असेल अशी मला आशा आहे. विराटने दहा वर्षे मागे जायला हवे. त्यावेळी त्याचे लग्न झालेले नव्हते. त्याला मुल नव्हते. दहा वर्षापूर्वी त्याच्याकडे काही नव्हते. त्याने त्याचे वय विसरायला हवे. त्याने आतापर्यंत काय केलंय हेदेखी विसरुन जायला हवं,” असं मायकेल वॉन म्हणाला. तसेच सध्या तो शून्य ते दहा धावसंख्येमध्येच संघर्ष करतोय. यामधून तो बाहेर पडला तर तो चांगला खेळ करेल असंदेखील मायकेल वॉन म्हणाला.

Advertisement

हेही वाचा >> जडेजाने आयपीएल सोडल्यानंतर धोनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘त्याची जागा…’

दरम्यान, या हंगामात विराट कोहलीने आतापर्यंत एक आर्धशतक झळकावले आहे. तसेच त्याने एकूण दोन वेळा ४० पेक्षा जास्त धावा केल्या असून १२ सामन्यांमध्ये २१६ धावा केल्या आहेत. १२ सामन्यांमध्ये तो तीन वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे.

Advertisement

Source link

Advertisement