गेले 33 वर्षे ही व्यक्ती 10वीं च्या परीक्षेत होत होती नापास! यावेळी कोरोना मुळे झाली पास

Mohammed Naruddin
Image Source: ANI

कोरोना विषाणूच्या साथीमुळे सरकारने अनेक सवलती जाहीर केल्या. अशा परिस्थितीत हैद्राबाद राज्य सरकारने या प्राणघातक विषाणूचा फैलाव झाल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांचे नशिब उलटले. हैदराबादचा 51 वर्षीय मोहम्मद नुरुद्दीन 33 वर्षे दहावीत शिकत होते. परंतु मोहम्मद नुरुद्दीन हे यावेळी सरकारने घेतलेल्या निर्णया मुळे पास झाले.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना मोहम्मद नुरुद्दीन म्हणाले की, 1987 पासून ते सलग दहावीची परीक्षा देत आहेत. पण दरवर्षी कमकुवत इंग्रजीमुळे ते अपयशी ठरत होते. 33 वर्षे सतत अपयशी ठरल्यानंतरही त्यांनी कधीही हार मानली नाही. यावेळी कोरोनामुळे नशिबाने त्यांना पाठिंबा दर्शविला आणि सरकारच्या निर्णयामुळे मोहम्मद नुरुद्दीन पास झाले.

Advertisement

विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा साथीचा परिणाम शिक्षण क्षेत्रातही झाला आहे. संपूर्ण देशाच्या बोर्ड परीक्षा तोंडावर असताना हा (साथीचा रोग) सर्वत्र पसरला. कोरोना विषाणूच्या साथीने बर्‍याच राज्यांच्या बोर्ड परीक्षांवर परिणाम झाला.

बिघडलेली व्यवस्था पाहून बर्‍याच राज्यांच्या मंडळाने निर्णय घेतला की या वेळी कोणताही विद्यार्थी नापास होणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचा ताफा पास झाला. हैदराबादचे मोहम्मद नुरुद्दीन देखील 51 वर्षांच्या वयात, दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांपैकी एक आहेत.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here