कशामुळे पडले ‘पुणे’ हे नाव – जाणून घ्या

Pune
Image Source: Google Images

राष्ट्रकूट कालीन पुणे

इ.स पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील त्रैकूटक राजाची काही नाणी इंदापूर तालुक्यात सापडली यावरून पुणे परगणा हा या राजाच्या आमलाखाली असावा असा तज्ज्ञांचा तर्क आहे. त्याच प्रमाणे जुन्नर मधील उत्खननात जी नाणी मिळाली त्यावरून हे शहर आंध्राच्याही ताब्यात असावे असा कयास आहे.

Advertisement

काही वर्षांपुर्वी पुणे जिल्ह्यात इ.स. ७५४ च्या सुमारास एक ताम्रपट मिळाला. या ताम्रपटात पुण्याचा पहिलावहिला उल्लेख आढळतो. या ताम्रपटात पुण्याचे वर्णन ‘पुण्य विषय’ असे केलेला आहे. याचे पुरावे म्हणजे या ताम्रपटात पुण्याच्या आजुबाजुच्या पाच-सहा मैलाच्या टापूतील लहान लहान गावांचा उल्लेख आढळतो. या मध्ये बोपखेलचा बोपरखलु, दापोडीचा दर्प-फरिका, भोसरीचा बेहुसारिका तसेच कळसचा कळसच व मुळा नदीचा मुळा या नावानेच उल्लेख आढळतो.

तसेच राष्ट्रकुटांच्या आणखी एक ताम्रपटात १० व्या शतकामध्ये पुण्याचा उल्लेख ‘पुनकवाडी’ असा आढळतो. ‘पुण्य विषय’, ‘पुण्णक’, ‘पुनक वाडी’ अशी जुनी नवे पुण्याच्या संदर्भात आढळतात. हिंदू धर्माच्या कल्पनेप्रमाणे दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ठिकाण पुण्यप्रदच मानले जाई. आता पुणे हे मुळा व मुठेच्या संगमावर वसले असल्याने किवां पुण्यात पुण्येश्वराचे एक प्राचीन मंदिर असल्याने या गावास त्याकाळी ही नावे मिळाली असावीत असे दिसते.

Advertisement

पुढे दक्षिणेत प्रबळ ठरणाऱ्या यादवांनी राष्ट्रकुटांचा हा प्रदेश जिंकून घेतला असावा. मुठा नदीच्या काठावर जे घाट बांधले होते ते यादव कालीन बांधकामाची साक्ष देतात. यादवांनी जवळ जवळ तीन शतके पुण्यावर राज्य केले.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here