कोरोना हे नाव ऐकल्यावर आता भीती वाटायला लागली आहे, कारण वुहानच्या एका छोट्या मार्केट मधून जन्माला आलेला हा रोग अख्या जगाच्या मानगुटीवर बसेल याची कुणी कल्पना देखील केली नव्हती. 

तब्बल 3 महिने चीन या रोगाशी दोन हात करत आहे कदाचित हा रोग आटोक्यात आणण्यासाठी वुहान शहराने जी पाऊल उचलली ती खरंच आपल्या साठी आदर्श आहेत. पण राहून राहून सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की, ही चीन ने निर्माण केलेली जैविक विश्वयुद्धाची परिस्थिती तर नसावी? नाही हे अगदीच हवेत गोळीबार  केल्यासारखं अजिबात नाही कारण या Corona Outbreak च्या परिस्थिती निर्माण झालेले प्रश्न स्वतः चीननेच अनुत्तरित ठेवलेत आणि यातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे “ली वेनलिंग” ज्या व्यक्ती ने कोरोना डिटेक्ट केला त्या व्यक्तीला अटक करण्याचं कारण काय? ज्या कोरोना रोगाची कुणकुण चीन ला नोव्हेंबर मध्येच लागली होती, त्याची माहिती WHO ला जानेवारी मध्ये का देण्यात आली? 

Advertisement

ज्या कोरोना रोगाने जगातील बलाढ्य देशाला सळो की पळो करून सोडलं तो कोरोना वुहान पुरता मर्यादित कसा राहिला? हजारो किलोमीटर च्या अंतरावरील अमेरिका स्पेन इटली या देशात कोरोना ने मृत्यू चं तांडव घातलंय पण वुहान च्या शेजारीच असलेल्या बीजिंग आणि शांघाय मध्ये मात्र बोटावर मोजता येतील एवढेच रुग्ण. 

मग वुहान शहरातील कोरोना हा फक्त जगाला दाखविण्यासाठी घातलेला घाट होता का? जेंव्हा चीन या संकटाशी लढत होता तेंव्हा ४३२ मिलियन युरो ची स्पेन सोबतची medical equiment  ची deal कुठेतरी या संशयात भर पाडते का हॉंगकॉंग मधील लोकशाहीवादचं आंदोलन आणि त्यातून चीनी व्यापाऱ्यांवर झालेले हल्ले चीनच्या इतके जिव्हारी लागले आणि त्याचा बदला म्हणूनच चीनने हा पर्याय निवडला? या आणि असंख्य प्रश्नांची उत्तरं Xi Jinping कधी  देणार देव जाणे ? का वुहान इंस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी च्या लॅब मध्ये असंख्य रहस्य जपून आहेत त्या मध्ये हे प्रश्न  रहस्य बनून राहणार हे पाहायला हवं.

Advertisement

लेखआवडल्यासनक्कीशेअरकराआणिआमचेपेजलाईककरायलाविसरूनका. तुमच्याकडेजर interesting लेखअसतीलतरआम्हाला [email protected]  याइमेलआयडीवरपाठवा

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here