दिल्लीतून उत्तराखंडला प्रवास करणार्‍यांना करावी लागेल कोविड-१९ टेस्ट

Image Source : Google Images

उत्तराखंडने दिल्लीहून राज्यात प्रवास करणार्‍या लोकांना देहरादूनच्या जॉलीग्रॅन्ट विमानतळावर कोविड -१९ चाचणी करणे बंधनकारक केले आहे.

राष्ट्रीय राजधानीत कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. दिल्लीहून आलेल्या लोकांच्या अनिवार्य चाचण्या घेण्याचा निर्णय देहरादून आरोग्य विभागाने घेतला आहे.

Advertisement

या अहवालानुसार देहरादूनमधील अशारोडी चेकपोस्टशिवाय विमानतळ व रेल्वे स्थानकांवर या चाचण्या घेण्यात येणार आहेत.

गेल्या आठवड्यात सुमारे १००० लोकांच्या सॅम्पलिंग फेरीनुसार, दून सीमेवर तब्बल २९ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली. व्हायरसनचा संसर्ग झालेल्यांपैकी २५ जण दिल्ली-एनसीआरमधील होते.

Advertisement

तसेच पर्यटक या मोसमात अधिक पर्यटक गर्दी करतात आणि या पार्श्वभूमीवर उत्तराखंड प्रशासनाने आधीच खबरदारीचा उपाय सुरू केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना देहरादूनचे डिस्ट्रिक्ट सरविलंस अधिकारी डॉ. आर.के दीक्षित म्हणाले की, “गेल्या पंधरवड्यात दिल्ली ते उत्तराखंड, विशेषत: देहरादूनपर्यंत लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे समजले आहे.

Advertisement

राजधानीतील लोक येथे मुख्यत: विवाहसोहळा आणि सहलीसाठी येत असतात आणि अशा प्रकारे डोंगरावर किंवा इतर पर्यटनस्थळांकडे जाण्यापूर्वी त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे.”

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार सीमेवर तपासणी आत्ताच विनामूल्य घेण्यात येत असून, येत्या काही दिवसांत त्यासाठी पैसे द्यावे लागतील.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here