CM एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार: सुप्रीम कोर्टाने निकाल लिहून दिला, केवळ निर्णय बाकी; अनिल परब यांचा दावा

CM एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार: सुप्रीम कोर्टाने निकाल लिहून दिला, केवळ निर्णय बाकी; अनिल परब यांचा दावा


मुंबई11 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा निर्णय जवळपास लिहून दिला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदार अपात्र ठरणार हे निश्चित आहे, असे शिवसेना (ठाकरे) नेते अनिल परब यांनी बुधवारी स्पष्ट केले. सरकार पडणार असल्याचे ठावूक असल्यामुळेच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

Advertisement

शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी गुरुवारपासून सुरू होणार आहे. अनिल परब यांनी या प्रकरणी बुधवारी पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना हे सर्वच आमदार अपात्र ठरणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, उद्यापासून शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल जवळपास लिहून दिला आहे. आता अध्यक्षांना केवळ सुनावणी करायची आहे.

सध्या केवळ वेळकाढूपणा सुरू

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. तसेच त्याचा अर्थही लावला आहे. आता केवळ निर्णय येणे बाकी आहे. यामुळे हे सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे, असे अनिल परब म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने राज्यपालांची भूमिका, घटनेतील 10 वे कलम आदी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील. हे आमदार अपात्र ठरणे म्हणजे सरकार कोसळणे आहे. अन्य 23 आमदारांची याचिका प्रलंबित असल्यामुळे हा केवळ वेळकाढूपणा आहे, असे परब म्हणाले.

Advertisement

…म्हणून भाजपने राष्ट्रवादी फोडली

यावेळी त्यांनी भाजपने शिंदे सरकार पडणार असल्याचे ठावूक असल्यानेच राष्ट्रवादी फोडल्याचाही आरोप केला. ते म्हणाले की, भाजपला शिंदे सरकार कोसळणार असल्याचा पूर्ण अंदाज आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. आता शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीनेही अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे.

Advertisement

…तोपर्यंत मराठ्यांना शाश्वत आरक्षण मिळणार नाही

मराठा समाजाला त्यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय शाश्वत आरक्षण मिळणार नाही. यासाठी योग्य इम्पेरिकल डेटा मागास आयोगाने देणे गरजे असल्याचेही अनिल परब यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या कुणबी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण होऊन सामाजिक आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे, असेही अनिल परब यावेळी म्हणाले.

AdvertisementSource link

Advertisement