Central Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची संधी, फक्त मुलाखत देऊन मिळवा नोकरी


  उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. यासाठी वॉक इन मुलाखत ११ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.

  Advertisement

  Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेने मेडिकल प्रॅक्टिशनर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वे निवड मंडळ या रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेणार नाही. त्याऐवजी उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. यासाठी वॉक इन मुलाखत ११ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण १८ पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांची निवड ही कायमस्वरूपी नसून कंत्राटी पद्धतीने केली जाईल. हा करार तीन महिन्यांसाठी असेल.

  रिक्त जागांचा तपशील

  चिकित्सक (Physicians)- ४

  Advertisement

  ऍनेस्थेटिस्ट / इंटेन्सिव्हिस्ट (Anaesthetist/ Intensivists) – ४

  जीडीएमओ (GDMO) – १०

  Advertisement

  (हे ही वाचा: ESIC Recruitment 2022: नोकरीची संधी! ८० हजारांहून अधिक पगार, दहावी-बारावी पास करू शकतात अर्ज)

  पात्रता काय?

  विशेषज्ञ: भारत सरकार, MBBS द्वारे मान्यताप्राप्त मेडिकल कौन्सिलमधून मेडिसिनमधील पदवी

  Advertisement

  जीडीएमओ: भारत सरकार, MBBS द्वारे मान्यताप्राप्त वैद्यकीय परिषदेकडून मेडिसिनमधील पदवी

  (हे ही वाचा: SBI Recruitment 2022: सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी, ‘असा’ करा अर्ज)

  Advertisement

  वयोमर्यादा काय?

  सीएमपी (CMP) साठी वय ५३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

  मुलाखतीसाठीचा पत्ता

  इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी ११ जानेवारी २०२२ रोजी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचावे लागेल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई- 400027

  Advertisement

  अधिक तपशीलांसाठी, उमेदवार मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

  लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

  Advertisement

  Source link

  Advertisement