BRSची महाराष्ट्रात संघटन बांधणीची धडपड: चारित्र्यवान जनप्रतिनिधींचा शोध सुरू; KCR साठी लोकसभा इलेक्शन लिटमस टेस्ट


संतोष देशमुख | छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

भारतीय राष्ट्रीय समितीने तेलंगणाजवळील महाराष्ट्र राज्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संघटन बांधणीला वेग आला आहे. सरचिटणीस हिमांशू त्रिवेदी येऊन प्राथमिक आढावा घेऊन गेलेत. तर चारित्र्यवान जनप्रतिनिधींचा शोध घेऊन त्यांच्याशी थेट प्रमुख पदाधिकारी संवाद साधून पक्षात येण्यासाठी निमंत्रण दिले जात आहे. दुसरीकडे इच्छुकांची भाऊ गर्दी आहे. त्यांना एक चांगला राजकीय नवा पर्याय व व्यासपीठ मिळाले आहे.

Advertisement

सत्तासंघर्षाने राजकारण तापले

  • महाराष्ट्रात सत्तासंघर्षानंतर आणि त्यापूर्वीही राजकीय पक्षांत कमालीची अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र आहे. आधी भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत असूनही ते एकत्र आले नाहीत.
  • राष्ट्रावादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शपथ घेऊन स्थापन केलेले सरकार काही तासांतच कोसळले.
  • शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी म्हणजचे महाविकास आघाडी होऊन सरकार स्थापन झाले होते. त्याला अडीच वर्ष पूर्ण होण्याअगोदरच एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार बाहेर पडले.
  • भाजपला साथ देऊन एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केली. यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. या बदल्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एवढच नव्हे तर त्यांना निवडणुक आयोगाकडून शिवसेना पक्ष व चिन्ही मिळाले आहे. मात्र, हा वाद आणखी संपूष्टात आलेला नाही.
  • काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु आहेत. त्यात लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे पक्ष बांधणीसाठी हलचाली सुरु झाल्या आहेत. त्यात बीआरएसने महाराष्ट्रात इंट्री केली असून निवडणूकही लढवली जाणार आहे.

जनप्रतिनिधींचा शोध

Advertisement

समितीचे प्रमुख तथा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. फोनवरून पक्ष प्रवेशासाठी निमंत्रण दिले जात आहे. तर सरचिटणीस हिमांशू त्रिवेदी यांनी नुकतेच शहरात येऊन गेले. त्यानंतर दोन दिवसांनी रविवारी संत एकनाथ नाट्यगृहात संघटन बांधणीसाठी बैठक पार पाडली. बैठकीत काही प्रवेश झाले आहेत. महत्त्वाच्या पदांसाठी इतर पक्षातील इच्छुक सावध भूमिका घेऊन पाऊल टाकताना दिसून येत आहे.

आम आदमी पार्टीत बंडाळी, बीआरएसमध्य् लवकरच पक्ष प्रवेश

Advertisement

आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांना प्रचार व प्रसारासाठी पैशांची निकड असते. मात्र, वरतून फंड उपलब्ध करून दिला जात नाही. स्वतच्या खिशातून पैसे खर्च करणे पदाधिकाऱ्यांना परवडत नाही. दुसरे वरिष्ठ पदाधिकारी येऊन संघटन बांधणीसाठी प्रयत्न करत नाही. यामुळे पदाधिकारी हैराण झाले आहेत. पदाचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी हलचाली सुरु केल्या आहेत. रविवारच्या कार्यक्रमातही त्यांचा सहभाग प्रामुख्याने जाणवला. जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्यासह अनेकांनी पदाचा राजीनामा दिला आहे. याच बरोबर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारीही बीआरएसच्या गळाला लागले आहेत.

कार्यकर्त्यांना 2 लाखांचे विमा कवच – हिमांशू त्रिवेदी

Advertisement

पक्ष प्रवेशानंतर दोन लाखांचे विमा संरक्षण कवचतेलंगनामध्ये बीआरएसने सक्रिय कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा विमा उतरवून त्यांना दोन लाखांचे संरक्षण कवच बहाल केले आहे. अशा प्रकारे विमा कवच देणारा हा पहिला पक्ष असल्याचा दिवा सरचिटणीस हिमांशू त्रिवेदी यांनी दिव्य मराठीशी बोलताना केला. तसेच छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रसह जिथे जिथे आम्ही जाऊ तेथेही पदाधिकाऱ्यांना विमा संरक्षण कवच दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement