Brazil boat incident : ब्राझीलच्या सुल मिनास धबधब्याजवळ खडक कोसळला


  Advertisement

  नवी दिल्ली : ब्राझीलच्या सुल मिनास इथल्या धबधब्याजवळ भला मोठा खडक कोसळून सात जणांचा मृत्यू झालाय तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या दुर्घटनेची दृश्य उपस्थितांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. कॅपिटोलियो परिसरात अनेक जण बोटिंगसाठी येतात. मात्र पाण्यात उभा असलेला खडक दोन बोटींवर काळ बनून कोसळला
   
  व्हिडीओमध्ये दिसते की, धबधब्याजवळ काही मोटरबोट फिरत आहे. प्रवासी देखील याचा आनंद घेत आहे. दरम्यान अचानक धबधब्याजवळील एक खडक तीन मोटरबोटवर कोसळतो. स्थानिक वेळेनुसार हा अपघात सकाळी 11 च्या दरम्यान झाला आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मिनास गेरीस राज्यात मागील 24 तासापासून पाऊस पडत आहे. पावसामुळे खडक कोसळण्याची शक्यता आहे. 

   

  Advertisement

  लेफ्टिनेंट पेद्रो एहारा  (Lieutenant Pedro Aihara) यांनी घटनेची संपूर्ण माहिती देताना सांगितले की, तीन मोटरबोटवर हा खडक कोसळला आहे. 32 जणांना सुरक्षित काढण्यात यश आले आहे. यापैकी 9 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहिम सुरू आहे. आतापर्यंत अपघातात 20 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

  Advertisement

   

  Advertisement

  इतर महत्त्वाच्या बातम्या :

   

  Advertisement

  Source link

  Advertisement