Blood Test Detecting Cancer : एका ब्लड टेस्टच्या माध्यमातून होणार 50 प्रकारच्या कॅन्सरचं निदान


  Advertisement

  Blood Test Detecting Cancer : कॅन्सर किंवा कर्करोग अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार. हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. यातल्या कर्करोगाच्या काही प्रकारावर अजूनही उपाय शोधले जात आहे. कर्करोग नेमका कोणाला होऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नाही. ब-याच रुग्णांच्या बाबतीत कर्करोगाच्या दुस-या किंवा तिस-या टप्प्यात या रोगाचे निदान झाल्याचे देखील समजते. काही वेळा योग्य ते उपचार करून रुग्ण यातून बरा होता पण काहींच्या नशीबी मात्र मरण असते. मात्र आता एक दिलासा देणारी बातमी समोर येत असून एका ब्लड टेस्टच्या माध्यमातून तब्बल 50 पेक्षा अधिक कॅन्सरचे निदान होणार आहे. 

  ब्रिटनद्वारा संचालित नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) सोमवारी ग्रेल इंक कंपनी गॅलरी ब्लड टेस्ट करत जगातील सर्वात मोठ्या निरिक्षणाला सुरुवात करणार आहे. या माध्यमातून 50 पेक्षा अधिक प्रकारच्या कॅन्सरची  लक्षणे दिसण्याअगोदरचं कॅन्सरचे निदान होण्यास मदत होणार आहे. गॅलरी ब्लड टेस्ट(Galleri blood test) असे या टेस्टचे नाव आहे. या टेस्टच्या माध्यमातून रक्तातील डीएनचे परिक्षण केले जाते. यामुळे कॅन्सरचे निदान लवकर होण्यास मदत होईल आणि रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करण्यात येईल.

  Advertisement

  नॅशनल हेल्थ सर्व्हिसने सांगितले की, या मोहिमेत आम्हाला 1 लाख 40 हजार स्वयंसेवकांची गरज आहे. ज्यामुळे ही टेस्ट किती चांगले काम करेल याचा अंदाज येईल. सहभागी स्वयंसेवकांच्या गॅलरी टेस्टबरोबरच त्याच्या रक्ताच्या नमुन्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. किंग्ज कॉलेजचे लंडन येथील प्रोफेसर पीटर ससिएनी म्हणाले की, आम्हाला गॅलरी टेस्टच्या माध्यमातून याचा अभ्यास करायचा आहे की, शेवटच्या स्टेजला पोहचणाऱ्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येत घट होण्यास ही टेस्ट मदत करेल की नाही. जर तसे घडले आणि कॅन्सरचे निदान लवकर झाले तर ही एक गेम चेंजर टेस्ट ठरणार आहे.  त्यामुळे या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी आम्ही उत्साही आहोत.

  या अगोदर जून महिन्यात आलेल्या जर्नल एनल्स ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये एक अभ्यास प्रसिद्ध झाला होता. या मध्ये सांगितले होते की, टेस्टमुळे कॅन्सर झालेल्या 2,823 आणि 1,254 लोकांमध्ये काम केले आहे. यामुळे 51.5 टक्के लोकांचे निदान करण्यास मदत झाली आहे. तर 0.5 टक्के लोकांमध्ये चुकिची ठरली आहे. जवळपास 55 टक्के रुग्णांमध्ये ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते. तर 88.7 टक्के रुग्णांमध्ये शरीरात असणारे कॅन्सरचे टिश्यू ओळखण्यास मदत झाली आहे. जगभरातील लाखो लोकांना कॅन्सरमुळे प्राण गमवावे लागतात.

  Advertisement  Source link

  Advertisement

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here