BJP आमदार प्रशांत बंब अन् उपसरपंचात राडा: भर कार्यक्रमात भ्रष्टाचारावरून बाचाबाची, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

BJP आमदार प्रशांत बंब अन् उपसरपंचात राडा: भर कार्यक्रमात भ्रष्टाचारावरून बाचाबाची, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल


छत्रपती संभाजीनगर41 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर मतदार संघाचे भाजप आमदार प्रशांत बंब व एका माजी उपसरपंचात भर कार्यक्रमात बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारावरून हे दोन्ही नेते एकमेकांना भिडले. त्यांच्यातील गरमागरम संवादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

Advertisement

यासंबंधीच्या वृत्तानुसार, आमदार प्रशांत बंब ‘जनता दरबार’ कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन करत होते. यावेळी सभास्थळी उपस्थित असलेल्या माजी उपसरपंचाने ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आक्रमक पवित्रा घे्तला. यावेळी बंब व संबंधित उपसरपंचाने एकमेकांवर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली.

प्रशांत बंब यांच्या कथनी अन् करणीत फरक

Advertisement

आमदारांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. तुम्ही सकारात्मक बोलता, पण प्रत्यक्षात नकारात्मक कामे करतात. कधीतरी सकारात्मक कामेही करा, असे उपसरपंच या व्हिडिओत आमदार प्रशांत बंब यांना खडेबोल सुनावताना दिसून येत आहेत.

आमदार बंब यांनी केला जोरदार युक्तिवाद

Advertisement

दुसरीकडे, आमदार प्रशांत बंब संबंधित उपसरपंचाला उद्देशून जोरदार युक्तिवाद करत आहेत. तू अगोदर खोटे बोलला की नाही. तू अगोदर माझे ऐकून घे. प्लिज असे करू नको. तुले जे बोलायचे आहे, ते नंतर बैठक घेऊन बोल. मी याचे बोलणे ऐकून घेतले आहे. मी 15 तारखेच्या आत नागरिकांशी संवाद साधतो, असे उद्गार प्रशांत बंब व्हायरल व्हिडिओत काढताना दिसून येत आहेत.

खाली पाहा या घटनेचा व्हायरल व्हिडिओ

AdvertisementSource link

Advertisement