बिग बी, रजनीकांत, प्रियांका चोप्रा आणि अन्य कलाकार देतायत घरात राहण्याचा संदेश.

Image Source: Google

अमिताभ बच्चन, रजनीकांत, प्रियांका चोप्रा, रणबीर कपूर, मोहनलाल आणि आलिया भट्ट यांच्यासारख्या लोकप्रिय कलाकारांनी ‘फॅमिली’ नावाच्या शॉर्ट फिल्मसाठी काम केले आहे.

सोमवारी रात्री 9 वाजता सोनी नेटवर्कच्या सर्व वाहिन्यांवर प्रीमियर झालेल्या या लघुपटात घरी राहण्याचे, स्वच्छता राखण्याचे, घरातून काम करण्याचे आणि Social Distancing ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा संदेश दिला आहे. 

Advertisement

या चित्रपटाची सुरूवात बिग बीने आपला ‘काळा चष्मा’ शोधण्यापासून केली आहे. त्यानंतर ते दिलजित दोसांझ, रणबीर कपूर यासारखे कलाकार त्यांचा ‘काळा चष्मा’ शोधण्याचा प्रयत्न करतात.

अखेरीस, प्रियंका चोप्रा त्यांचा ‘काळा चष्मा’  शोधून काढते आणि त्यांना तो आत्ताच का लागतोय हे विचारते. ते उत्तर देतात,

Advertisement

“मला या सनग्लासेसची तशी आवश्यकता नाहीये कारण मी काही दिवस घराबाहेर जाणार नाही. ते जर अडगळीच्या ठिकाणी पडल्यास ते हरवले जातील. जर ते हरवले तर आपण सर्वांना त्यांचा शोध घ्यावा लागेल. आता मी तुम्हा सर्वांना त्रास का द्यावा?”

शेवटी बिग बीने सर्वांना सांगितले की या फिल्म मध्ये काम केलेल्या अभिनेतांपैकी एकाही अभिनेताने आपापल्या घरातून बाहेर पाऊल न ठेवता, आपल्याच घरात राहून हि फिल्म बनवली आहे. ह्या फिल्म चा उद्देश म्हणजे चित्रपट कामगार आणि दैनंदिन वेतन मिळवणार्‍यांन करिता निधी गोळा करण्यासाठी हे कलाकार एकत्र आले आहेत. 

Advertisement

शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी click करा-

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. तुमच्या कडे जर interesting लेख असतील तर आम्हाला [email protected] या इमेल आयडीवर पाठवा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here