अखेर मराठी राज्याने शेवटचा नि:श्वास सोडला… जाणून घ्या

Maratha Kingdom
Image Source and copyright: Atul Patekar

पेशवाई व पुणे

इ.स. १७१३ साली शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांची पेशवे म्हणुन नेमणुक केली. त्यावेळी पुणे प्रांत निंबाळकरांचे प्रशासक बाजी कदम यांच्या ताब्यात होता. वाटाघाटी करुन हा भाग शाहु महाराजांच्या ताब्यात आला.

Advertisement

इ.स. १७२० मध्ये बाळाजी विश्वनाथ भट पहिले पेशवे यांनी पुणे हीच आपली राजधानी केली. इ.स. १७३१ मध्ये त्यांनी शनिवार वाडा बांधला.

१७३१ ते १७६० ह्या कालावधीत शहराची भरभराट झाली. पण १७६१ ला मराठ्यांना पानिपतला फार मोठा पराभव स्वीकारावा लागला. ह्यामुळे मराठी साम्राज्य काही काळ कोसळले.

Advertisement

याचा फायदा घेवुन १७६३ ला निजामाने पुण्यावर हल्ला करुन शहरात लुटमार व जाळपोळ केली. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मराठे सरदार एकत्र आले व त्यांनी १७६५ ला राक्षसभुवन येथे निजामाला चांगलेच पराभुत केले.

इ.स. १७६५ ते १७९५ पर्यंतचा माधवरावांच्या कारकिर्दीचा काळ पुण्याच्या इतिहासातील सर्वात वैभवशाली काळ होता. पानिपतच्या पराभवाने खचलेले मराठी मन पुन्हा सामर्थ्यशाली बनू लागले. परंतु हा ३० वर्षांचा काळ जातो न जातो तोच १७९५ ला सवाई माधवरावांनी आत्महत्या केली. दुसरे बाजीराव गादीवर आले.

Advertisement

स.न १७९५ ते १८१८ हा काळ पुण्याच्या जीवनातील अत्यंत पडता काळ होता. इ.स. १८०० ला नाना फडणवीसांच्या मृत्यु नंतर पेशव्यांचा राज्यावरील ताबा अधिकच ढिला झाला. इ.स. १८०२ ला यशवंतराव होळकरांनी आपल्या बंधुच्या मृत्युचा सुड घेण्यासठी पुण्यावर हल्ला केला.

त्यावेळी दुसरा बाजीराव पळुन इंग्रजांच्या आश्रयाला गेला व त्याने इंग्रजांशी करार केला. हा करार म्हणजे त्याने मराठी राज्यावर उदकच सोडले होते. १८१७ पर्यंत मराठी राज्य टिकून होते शेवटी १७ नोव्हेंबर १८१७ रोजी मराठी राज्याने शेवटचा निश्वास सोडला.

Advertisement

इथून पुढे इंग्रजी राजवटीला सुरवात झाली.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here