कोरोना च्या प्रादुर्भावामुळे Asia Cup रद्द; BCCI चे अध्यक्ष सौरभ गांगुली यांची घोषणा

Image Source: Google Images

कोरोना प्रादुर्भावामुळे एशिया कप रद्द करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी केली आहे.

क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एशिया कप स्पर्धा 2020 रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी ही घोषणा केली. एका खाजदी चॅनेलसोबत बोलताना त्यांनी इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान ही घोषणा केली.

Advertisement

नियोजित कार्यक्रमानुसार यंदाचा एशिया कप (Asia Cup 2020) सप्टेंबर मध्ये होणार होता. यावेळी एशिया कपचं यजमान पदाची जबाबदारी पाकिस्‍तान क्रिकेट बोर्ड (PCB) कडे होती. माहितीनुसार, वाढता कोरोना संसर्ग आणि आयपीएल 2020 (IPL 2020) साठी वेळ काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलंय जातंय.

नियोजित वेळेनुसार सप्टेंबर महिन्यात होणारा एशिया कप रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले, की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी20 वर्ल्ड कप देखील रद्द होण्याची शक्यता आहे.

Advertisement

क्रिकेट प्रेमींसाठी आनंद आणि दुःख सोबत

एकीकडे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी मालिकेद्वारे चार महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी क्रिकेटचा अनुभव पूर्णत: वेगळा असेल. खेळाडूंना मैदानासह ते राहत असलेल्या हॉटेलवरही नियम पाळावे लागणार आहेत. रिझर्व्ह खेळाडू बॉल बॉय म्हणून काम करतील तर स्टम्प्स आणि बेल्स साफ करण्यासाठी ब्रेक घेतला जाईल. याशिवाय पीपीई किटसह पत्रकार आणि फोटोग्राफर्स सामन्याच वार्तांकन आणि चित्रीकरण करीत आहेत. तर दुसरीकडे आज एशिया कप रद्द झाल्याची बातमी आली. त्यामुळे क्रिकेट प्रेमींसाठी एकाच वेळी आनंद आणि दुःख देणारी बातमी आली असे म्हणल्यास वावगं ठरणार नाही.

Advertisement

मैदानावर कोणते नियम पाळावे लागणार?

 • रिझर्व्ह खेळाडू बॉल बॉयचं काम करणार
 • स्टम्प्स आणि बेल्स साफ करण्यासाठी ब्रेक घेणार
 • पीपीई किट घालून पत्रकार आणि फोटोग्राफर्स मॅच कव्हर करणार
 • केवळ दोन्ही संघाचे कर्णधार आणि सामनाधिकारी नाणेफेकीसाठी बाहेर जाणार
 • नाणेफेकीदरम्यान कोणताही कॅमेरा नसेल किंवा शेकहॅण्डही केलं जाणार नाही
 • पंच स्वत:च्या बेल्स घेऊन मैदानात जातील
 • खेळाडू एकमेकांचे ग्लोव्ज, शर्ट, पाण्याची बाटली, बॅग किंवा स्वेटर वापरु शकणार नाहीत
 • खेळाडू गळाभेट घेऊ शकणार नाहीत

ग्राऊंड स्फाफ मैदानावर खेळाडूंच्या 20 मीटरच्या कक्षेत जाणार नाही. इथे दोन चौरस फुटांच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करावं लागेल.

Advertisement
 • स्कोअरर पेन किंवा पेन्सिल शेअर करु शकणार नाही
 • आयसीसीने आधीच चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घातली आहे. दोन इशाऱ्यानंतर पाच धावांचा दंड लावला जाईल.
 • जर षटकारानंतर चेंडू स्टॅण्डमध्ये गेला तर ग्लोव्ज घातलेले खेळाडूच तो फेकू शकतात. इतर कोणालाही चेंडूला हात लावण्याची परवानगी नसेल.
 • आठवड्यातून दोन वेळा खेळाडूंची कोरोना चाचणी होईल, तसंच खेळाडू हॉटेलबाहेर जाऊ शकणार नाहीत

याशिवाय खेळाडू ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत तिथले दरवाजे एका अॅपद्वारे उघडण्याची सोय आहे, ज्यात हॅण्डला हात लावण्याची गरज नाही. तसंच खेळाडूंना कोणतीही रुम सर्विस नसेल किंवा लिफ्टही नसेल.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here