Amravati : गुरुजीचा तोल सुटला! १७ वर्षांनी लहान विद्यार्थिनीला म्हणाले, चल आपण…


अमरावती : गुरू शिष्याचं आणि शिक्षक – विद्यार्थ्यांचं नातं हे पवित्र मानलं जातं. विद्यार्थ्याचं भवितव्य घडवण्यासाठी शिक्षक प्रयत्नाची पराकाष्टा करतात. मात्र याच पवित्र नात्याला काळीमा फासत एका चाळीस वर्षीय शिक्षकाने आपल्याहून १७ वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चल आता आपण रिलेशनमध्ये येऊ, असं म्हणत शिक्षकाने विनयभंग केला, असा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

जिल्ह्यातील मोर्शी येथील प्रवीण श्रीकृष्णराव धोटे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. यातील सोळा वर्षीय विद्यार्थिनीने आरोपी शिक्षकाविरुद्ध मोर्शी पोलीस ठाण्यात धाव घेतली. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पेशाने शिक्षक आहे. वरूड येथील एका शाळेत शिकणाऱ्या घेणाऱ्या विद्यार्थिनीची आरोपी शिक्षकासोबत ओळख झाली. दरम्यान, आरोपीने यंदा तिचा प्रवेश अमरावती येथील एका महाविद्यालयात करून दिला. त्यामुळे दोघांमधील संवाद व विचारांची देवाण-घेवाण वाढली. दरम्यान, शिक्षकाने या संवादाचा चुकीचा अर्थ लावत तिला थेट चल आपण रिलेशनमध्ये राहू असा आग्रह धरला. या शिक्षकाच्या या प्रकाराला कंटाळून विद्यार्थिनीने थेट पोलीस ठाणे गाठले.

अंगाचा थरकाप उडवणारी घटना; सुस्साट ट्रॅव्हल्सने दिली दुचाकीला धडक; दोन युवकांनी गमावला

आरोपी शिक्षकाने तिला कॉल केला. आपल्यातील शिक्षक व विद्यार्थिनीचे नाते आता संपून टाकू. मला तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे. तू खूप आवडतेस आणि तुझ्यासोबत बोलायचे आहे. त्यानंतर वारंवार कॉल आणि सतत व्हाट्सअप मेसेजवर चॅट करून विद्यार्थिनीचा विनयभंग केला, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

Advertisement

शेतकरी वैतागला आणि थेट संत्र्यांच्या पिकाचा दशक्रिया विधी करून लाखोंची बाग केलीSource link

Advertisement