Amazon Deal : आयपॅड खरेदी करायचाय? जाणून घ्या iPad Air ची वैशिष्ट्ये


Advertisement

Amazon Offer on iPad Air (64GB) : मुलांच्या अभ्यासासाठी, व्हिडीओ, गेमिंग किंवा सिनेमा पाहण्यासाठी आयपॅडपेक्षा चांगले गॅझेट नाही. आयपॅडची फोन आणि लॅपटॉप सारखीच मोठी स्क्रीन असते. तसेच ते कुठेही नेण्यास सुलभ असतात. आयपॅडवर गेम खेळण्याची एक वेगळीच मजा आहे. iPad Air वर 18 हजारांहून अधिक सूट देण्यात आली आहे. आयपॅड एअरमध्ये 64GB आणि 256GB असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. 

iPad Air (64GB) ची किंमत 54,900 रुपये आहे परंतु डीलमध्ये 50,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयपॅड एअरवर 7% सूट आहे. तसेच 14,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. यामध्ये ग्राहक जुना टॅब किंवा फोन देऊन 14,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळवू शकतात. याशिवाय हा टॅबलेट खरेदी करण्यासाठी नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे. त्यामुळे ग्राहक हप्त्यांद्वारे फोन खरेदी करू शकतात. 

Advertisement

आयपॅड एअर चे वैशिष्ट्ये
– या आयपॅडचा आकार 10.9 इंच असून यात आयओएस ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. 
– यात ट्रू टोन आणि पी3 वाइड कलरसह लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे, ज्यामुळे स्क्रीन सतत पाहताना डोळ्यांवर कोणताही ताण येत नाही. 
– या आयपॅडवर ग्राहकांना आवडीचा गेम खेळता येऊ शकतो. 
– गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी टच आयडी फिंगरप्रिंट सेन्सर आहे. ज्यामुळे ग्राहकांना लॉक अनलॉक करता येईल. 
– आयपॅड एअर सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे. सिल्व्हर, स्पेस ग्रे, रोज गोल्ड, ग्रीन आणि स्काय ब्लू. 
– आयपॅड एअरमध्ये वाय-फाय आणि सेल्युलर दोन्ही पर्याय आहेत. वाय-फाय आयपॅड एअरमध्ये कॉलिंगची सुविधा नाही, परंतु सेल्युलर आयपॅड एअरवरूनही कॉल करता येतात. सेल्युलर आयपॅड मिनीची किंमत 60,900 रुपये आहे. 

संबंधित बातम्या

Advertisement

OnePlus 9RT Launch Date : लवकरच भारतात येतोय ‘वनप्लस 9RT’; दमदार प्रोसेसरसह मिळतील ‘हे’ फीचर्स!

Amazon Deal : आयफोन यूजरसाठी खुशखबर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone XR

दिल्लीतील जुन्या दुचाकींचे इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये रूपांतर; महाराष्ट्रातील EV स्टार्टअपचं पाऊल

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

Advertisement