अक्षय कुमार च्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चा ट्रेलर झाला लॉन्च

Laxmmi Bomb
Image Source: Google Images

सुपरस्टार अक्षय कुमार नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळे आणि मजेदार घेऊन येतो. बेल बॉटमच्या टीझर नंतर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. यात अक्षय स्वतःचे रूपांतर भयंकर आणि गमतीशीर तृतीयपंथी मध्ये करतो.

या सिनेमात अक्षय एका अशा व्यक्तीची भूमिका साकारतोय ज्याला एका तृतीयपंथीच्या भूताने झपाटले आहे.
ट्रेलरच्या सुरूवातीलाच अक्षय आणि कियारा तिच्या आई-वडिलांना घरी भेटतायला जातात. तिची आई विशेषतः सावल्यांना घाबरत असते आणि अक्षय तिला या भीतीपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतो. सासर्‍याशी त्याचे समीकरण मजेशीर दाखवले आहे. पण जेव्हा अक्षयची वागणूक हळू हळू बदलू लागते आणि तो स्त्रियांसारखा वागतो तेव्हा प्रकरण हाता बाहेर जाते. त्याच्या भूतांवर विश्वास नसतो आणि अगदी सुरुवातीलाच तो बोलतो का ‘जीस दिन मेरे सामने भूत आया ना, मै चूडिया पेहेन लुगा’. ३ मिनिट -४० सेकंद ट्रेलर कॉमेडी, भय आणि इमोशन्स नी भरलेला आहे.

Advertisement

लक्ष्मी बॉम्ब हा राघवा लॉरेन्स दिग्दर्शित तमिळ चित्रपट मुनी २: कांचना चा रिमेक आहे. हिंदीचे दिग्दर्शनही राघवा लॉरेन्स यांनीच केले आहे. अक्षय सोबत या चित्रपटात कियारा अडवाणी, तुषार कपूर, शरद केळकर, तरुण अरोरा आणि अश्विनी काळसेकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

९ नोव्हेंबर २०२० रोजी हा चित्रपट डिजनी+हॉटस्टार वर रिलीज होणार आहे. चाहत्यांसाठी ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिवाळीची भेट ठरणार आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here