ABB इंडियाने केली 24100 रुपयांची पगारवाढ: मकर संक्रांतीची गोड भेट, कामगारांना सुखद धक्का


नाशिक6 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सातपूर औद्योगिक वसाहतीमधील बहुराष्ट्रीय कंपनी एबीबी इंडिया लिमिटेडने आपल्या कामगारांना तब्बल 24 हजार 100 रुपयांची भरघोस पगारवाढ देऊन मकर संक्रांतीची गोड भेट दिली आहे.

Advertisement

अशी आहे पगारवाढ, लाभ

एबीबी व्यवस्थापन आणि स्वर्गीय दत्ता सामंत प्रणित असोसिएशन ऑफ इंजिनीरिंग वर्कर्स यांच्यात 1 जानेवारी 2023 ते 30 जून 2027 या साडेचार वर्षांसाठी झालेल्या कराराद्वारे कामगारांना मासिक वेतनात 23700 रूपये अधिक प्रोडक्शन इन्सेन्टिव्ह 400 रूपये अशी 24100 रुपयांची थेट पगारवाढ मिळणार असून या व्यतिरिक्त प्रोव्हिडंड फंड व ग्रॅच्युटीचा लाभही मिळणार आहेत, त्याच बरोबर दिवाळी ऍडव्हान्स, गृह कर्ज, शूज, जॅकेट , शिफ्ट अलाउन्स इत्यादी सुविधा देखील मिळणार आहेत.

Advertisement

कामगारांना सुखद धक्का

प्रस्थापित कराराचा 41 दिवस कालावधी शिल्लक असताना देखील सदर कालावधीची वेतन वाढ आगाऊ स्वरूपात देऊन व्यवस्थापनाने कामगारांना सुखद धक्का दिला.कामगारांनी सुरक्षा, नैतिकता, अनुशासन व कार्यक्षमता यांचा अंगीकार करून कंपनी च्या प्रगती मध्ये सिंहाचा वाटा उचलल्याने सदर ची पगारवाढ करण्यात आल्याचे कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री गणेश कोठावदे ह्यांनी नमूद केले.

Advertisement

सादर करार यशस्वी आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्व संमतीने घडवून आणण्यात युनिअनच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष भूषण सामंत, सरचिटणीस संजय कोळवणकर, उपाध्यक्ष वर्गीस चाको, स्थानिक पदाधिकारी मनोज पवार , देवेंद्र पाटील , मेघराज अहिरे, हंसराज पवार,श्री तुषार निकम , तर व्यवस्थापना च्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश कोठावदे , एचआर मॅनेजर दयानंद कुलकर्णी , राहुल बढे , मनोज वाघ , रोहन घोगरे आदींनी मोलाचा सहभाग दिला.

पेढे वाटुन आनंद साजरा

Advertisement

करार स्वाक्षरी होताच सर्व कामगार सहकाऱ्यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. कार्यक्रमाचे नियोजन अतुल जाधव, महेश धार्मिक व मनोज हाडोळे आदींनी केले व सूत्रसंचालन किरण घोलप आणि रोहन सगर यांनी केले. मेघराज अहिरे यांनी आभार मानले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement