भारतातील ८ समुद्राकिनाऱ्यांना मिळाला ब्ल्यू फ्लॅगचा टॅग, जाणून घ्या नक्की काय आहे ब्ल्यू फ्लॅग

Blue Flag
Image Credit: New Indian Express

ब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनारे जगातील सर्वात स्वच्छ किनारे मानले जातात. या टॅगला पात्र होण्यासाठी, पर्यावरणीय, शैक्षणिक, आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता, सुरक्षितता, सर्विसेस आणि प्रवेशयोग्यतेच्या मानकांशी संबंधित ३३ कठोर निकष, पूर्ण असणे आवश्यक आहे.

भारतातील पाच राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेले आठ किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पर्यावरण खात्याने ही घोषणा केली. घोघला (दीऊ), शिवराजपूर (द्वारका-गुजरात), कासारकोड आणि पदुबिद्री (कर्नाटक), कप्पड (केरळ), रुशीकोंडा (आंध्र प्रदेश), राधानगर (अंदमान आणि निकोबार बेटे ), आणि गोल्डन बीच (पुरी-ओडिशा). पहिल्यांदाच आठ भारतीय समुद्रकिनारे एकाच वेळी इको लेबल टॅग घेण्यास यशस्वी झाले.

Advertisement

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, भारताला केवळ स्वच्छता आणि किनारपट्टी विकासासाठीच नव्हे तर आठ ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले राष्ट्र म्हणूनही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळत आहे. त्यांनी ट्वीट केले की, “हा एक उल्लेखनीय पराक्रम आहे कारण कोणत्याही देशाला एकाच प्रयत्नातून 8 समुद्रकिनार्‍यांसाठी ब्ल्यूफ्लॅग पुरस्कार देण्यात आला नाही.” ते पुढे म्हणाले की, “हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे; शासनाने शिफारस केलेले सर्व 8 समुद्रकिनारे आंतरराष्ट्रीय ब्ल्यूफ्लॅग सर्टिफिकेशन मिळवतात. अवघ्या दोन वर्षात हा पराक्रम करणारा आशिया-पॅसिफिक प्रदेशातील भारत पहिला देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.”

2018 मध्ये भारताने हा टॅग मिळवण्याच्या दृष्टीने काम सुरू केले होते आणि येत्या पाच वर्षांत ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशनचे नेटवर्क देशातल्या अशा १०० समुद्रकिनाऱ्यांना मिळवून देण्याची तयारी करत आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here