जळगाव36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर परिसरातील सेठ फत्रू लक्ष्मण शिंपी विद्यार्थी वसतीगृह या साडेसात हजार स्वेअरफूट जागेवर पुर्नबांधणी करून अहिर शिंपी समाज हितवर्धक समाज संस्थेचे भव्य वातानुकुलित समाजभवनासह, विद्यार्थांसाठी वसतीगृह, व्यापारी संकूल उभारले जाणार आहे. यासाठी समाजबांधवांमधूनच अडीच कोटीचा निधी उभारला जात आहे.
यास संस्थेनी मान्यता दिली असून शनिवारी होणाऱ्या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्यात यास मंजूरी देण्यात येणार असून निधी संकलनही होणार आहे. दरम्यान या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येस शेकडो समाजबांधवांनी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढून समाज एकसंघतेचा संदेश दिला.
असा आहे इतिहास
१९४७ मध्ये देश स्वातत्रोत्सव साजरा करीत असतानाच समाजबांधवांनी स्थापन केलेल्या शिंपी समाजाच्या श्रीक्षत्रिय अहिर संस्थेनेही आपली ७५ वर्ष पूर्ण केली आहे.
सर्व समाजबांधवांना एकसंघ करून सामाजिक एकोपा निर्माण करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे. १९०३ मध्ये जुने जळगावातील शिंपी मढी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागेवर समाजाच्या पंच मंडळींनी स्थापन केलेल्या संस्थेची नोंदणी १९४७ मध्ये देश स्वातंत्र्य झाला त्याच वर्षी झाली.
यांनतर वामन मोतीराम जगताप हे पहिले समाज अध्यक्ष होते. यानंतर आजतागायत १४ अध्यक्षांनी कार्यभार सांभाळला. १९८९ च्या काळातील नंदूसेठ जगताप यांचा कार्यकाळ अधिक प्रभावी ठरला.
या दरम्यान मंगलकार्यालयाची निर्मीती, यासह वसतीगृह आदींसह विविध समाजपयोगी कामे झाल्याची माहिती समाजपदाधिकाऱ्यांनी दिली.
क्यू आरकोड द्वारेच वर्गणी सकंलन
संस्थेच्या पारदर्शी व्यवहारामुळे ७५वर्ष निर्विवाद कामकाज झाले. सद्या संस्थेकडे स्वतंत्र क्यू आर कोड आहे, याद्वारेच समाजबांधवासह देणगीदारांकडून निधीचे संकलन खर्च होत असतो. जिल्ह्यात ३८ हजारावर तर शहरात ११ हजारावर समाजबांधव एक संघ झाला आहे. ३वर्षानंतर कार्यकारिणी निवड बिनविरोध अथवा समझोत्याने होत असून समाजबांधवांच्या शैक्षणिक, आर्थीक, सामाजिक उन्नतीसाठी संस्था कार्यशील आहे.
होणार ४१ सांस्कृतिक कार्यक्रम
वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ८० जयेष्ठ समाजबांधवांचा शनिवारी सायंकळी ५ वाजता सन्मान होणार आहे. यासह सकाळी ११ वाजेपासून समाजाच्या विविध जडणघडणावर प्रकाश टाकणारी यासह सामाजिक, पौराणिक विषयांवरील विविध ४१ सांस्कृितक कार्यक्रम सादर केले जाणार आहे. यासाठी २५० महिला सराव करीत आहेत. यासाठी समाजअध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव अनिल खैरनार, जितेंद्र शिंपी, मनोज भांडारकर आदी नियोजन करीत आहेत.