7 ते 8 जणांनी केली सुरक्षारक्षकांना मारहाण: त्यानंतर ​​​​​​​किर्लोस्कर कंपनीच्या आवारातील चंदनाच्या झाडांची केली चोरी

7 ते 8 जणांनी केली सुरक्षारक्षकांना मारहाण: त्यानंतर ​​​​​​​किर्लोस्कर कंपनीच्या आवारातील चंदनाच्या झाडांची केली चोरी


पुणे41 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कंपनीच्या सुरक्षारक्षकांना मारहाण करीत सात ते आठ जणांच्या टोळक्याने 11 हजार रूपये किंमतीच्या चंदनाच्या झाडांची चोरी केली आहे. ही घटना 22 ऑगस्टला पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास खडकीतील किलोस्कर कंपनीत घडली आहे. याप्रकरणी प्रदीप देशमुख (वय 41, रा. काळेवाडी ,पुणे) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किलोस्कर कंपनीत प्रदीप देशमुख सुपरवायझर आहेत. 22 ऑगस्टला पहाटेच्या सुमारास तिघेजण कंपनीच्या आवारात शिरले होते. त्यामुळे प्रदीपने शिट्टी वाजविली असता, चोरट्यांनी त्यांना धक्काबुक्की करुन खाली बसविले. त्याचवेळी त्यांच्या मदतीला सुरक्षारक्षक राजेंद्र पाटील आले असता, इतर चोरट्यानी त्यांनाही धमकी देउन शांत बसण्यास सांगितले. आम्ही पुर्ण तयारीत आलो आहे. शांत बसा, आम्ही चंदनाची झाडे कापल्यानंतर निघून जाउ असे सांगितले. चोरट्यांनी 11 हजार रूपयांची चंदनाची झाडे कापून नेली आहेत. पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करीत आहेत.

मेट्रो कामासाठी लागणारे साहित्य चोरणारे अटकेत

Advertisement

मेट्रो कामासाठी लागणारे लोखंडी साहित्य चोरणार्‍या दोघांना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 30 हजारांच्या लोखंडी प्लेट जप्त केल्या आहेत. ही घटना 22 ऑगस्टला रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे विद्यापीठ चौकात घडली आहे. याप्रकरणी सुरज जाधव (वय 23, आळंदी रोड) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज हा पुणे विद्यापीठ परिसरात मेट्रोच्या कामासाठी सुरक्षारक्षक आहे. 22 ऑगस्टला रात्री साडेबाराच्या सुमारास टेम्पोतून दोघेजण लोखंडी प्लेटसची चोरी करुन घेउन जात असताना त्याला दिसून आले. त्यानुसार त्यांनी दोघा चोरट्यांना ताब्यात घेउन पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार चतुःशृंगी पोलिसांनी धाव घेउन त्यांना अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलीस उपनिरीक्षक रूपेश चाळके यांनी केली.

AdvertisementSource link

Advertisement