61 वी हौशी मराठी नाट्य स्पर्धा: 26 नोव्हेंबरपासून सुरुवात, अकोला केंद्रावर 9 नाटकांचे होणार सादरीकरण


अकोला23 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित होणाऱ्या 61 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2022-23 स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला 15 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. अकोला-अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक फेरी 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर रोजी होणार आहे.

Advertisement

या सभागृहात रंगणार फेरी

अकोला केंद्रावरील प्राथमिक फेरी प्रमिलाताई ओक हॉल येथे तर, अमरावती येथील प्राथमिक फेरी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व्ही. एम. व्ही. अमरावती येथे संपन्न होत आहे. हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने गेली 60 वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जाते.

Advertisement

अकोला केंद्रातून 9 नाटक

यावर्षी अकोला केंद्रातून 9 आणि अमरावती केंद्रातून 11 संघ सहभागी झाले असून अकोला अमरावती मधील रसिक प्रेक्षकांसाठी नाट्य मेजवानीच असणार आहे. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या नाट्य स्पर्धेचा आस्वाद घ्यावा आणि कलाकारांना प्रोत्साहित करावे असे आवाहन समन्वयक सचिन विजय गिरी यांनी केले आहे. अकोला-अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक फेरी 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी कलावंताप्रमाणे सरिकांमध्येही उत्साह दिसून येत आहे.

Advertisement

ही नाटक होणार सादर

  • 26 नोव्हें. ‘अट आली अंगलट’, राजर्षी शाहू महाराज सावर्जनिक वाचनालय, अकोला
  • 27 नोव्हें. ‘ फास’ लेखक, माणुसकी मल्टी फाऊंडेशन, बुलढाणा
  • 28 नोव्हें. ‘फ्रेंडशीप’, हिमानी फाऊंडेशन, अकोला
  • 29 नोव्हें. ‘महादेव जातो गा’, धनश्री बहुउद्देशीय शिक्षण संस्था, बुलढाणा
  • 30 नोव्हें. ‘मी काहिही विसरलो नाही’, बुलढाणा, अर्बन चॅरिटेबल ट्रस्ट सोसायटी, बुलढाणा
  • 1 डिसें. ‘एक्सपायरी डेट’, अविष्कार बहुउद्दशिय संस्था, वाशिम
  • 2 डिसें. ‘लांब जाना, एक वेगळी प्रेमकथा’, ऊर्जा फाऊंडेशन, अकोला
  • 3 डिसें. ‘गोपाळा रे गोपाळा’, अंतरंग फाऊंडेशन, अकोला
  • 4 डिसें. ‘वळण’, अंकुर साहित्य संघ, अकोला

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement