पुणे12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मुंबई महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पथकाने पुणे ग्रामीण परिसरातून सुमारे 50 कोटी रुपयांचे 101 किलो मेथाक्युलोन हा अंमली पदार्थ जप्त केले. पुणे परिसरातून इतक्या मोठ्या प्रमाणावर डीआरआय पथकाने प्रथमच अमली पदार्थ जप्त केले आहे.
याबाबत डीआरआयच्या पथकाकडून तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी कायद्यातील एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदीनुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे. मुंबई डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुण्यातून एक संशयित वाहन जप्त करण्यात आले होते.
संबधित वाहनात पांढरे स्फटिकाचे साहित्य असलेले 4 निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम मिळून आले. यामध्ये मेथाक्युलोन हा अमली पदार्थ मिळून आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी बेकायदा विक्री, खरेदी, वाहतूक आणि निर्यातीत गुंतलेले असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. मेथाक्युलोन अमली पदार्थ विक्रीचे जाळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले असल्याची शक्यता असून, त्याअनुषंगाने डीआरआय पुढील तपास करत आहे
10 जणांची फसवणूक
पार्ट टाईमच्या नावाखाली चंदननगर भागातील 10 जणांची 25 लाख 65हजार 204 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वैशाली विनोद कुमार गुप्ता (वय ३६, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार विविध मोबाईल धारक तसेच टेलिग्राम युजर आणि विविध बँक खातेधारक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 जानेवारी 2023 ते 24 एप्रिल2023 दरम्यान ऑनलाईन घडली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी या एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.
जानेवारी महिन्यात त्यांना व्हाट्सपवर पार्ट टाइम जॉब साठी मेसेज आला होता. युट्युब चॅनेलला लाईक, सबस्क्राईब केल्या नंतर पैसे मिळतील असे सांगितले. तसेच या पार्ट टाईम जॉब साठी तुम्ही तयार असाल तर टेलिग्रामची लिंक पाठवण्यात येईल असे सांगण्यात आले. यानंतर वेगवेगळे टास्क करायला लावून फिर्यादी आणि इतरांची 25 लाख 65 हजार 204रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे करत आहेत.