35 गावातून महामार्ग: सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड जमिनीची मोजणी 5 जुलैपर्यंत पूर्ण होणार; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती


सोलापूर27 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड रस्त्याच्या मोजणी सुरू आहे. बार्शी, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील 35 पैकी 17 गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. 5 जुलैपर्यंत सर्व गावांची मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांनी दिली.

Advertisement

35 गावांमधून जाणार महामार्ग

अद्ययावत रोअर मशीनद्वारे मोजणी सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण 35 गावांमधून महामार्ग जात आहे. बार्शी तालुक्यातील 15 पैकी 8 गावांची मोजणी झाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चारपैकी तीन गावांची मोजणी झाली. अक्कलकोट तालुक्यातील 16 गावांमधील 92 गटांचा समावेश आहे. त्या तालुक्यातील 2 गावांची मोजणी पूर्ण झाली. मोजणीसाठी निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. चेन्नई-सुरत हे 1290 किलोमीटरचा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर तब्बल 12 तास प्रवासाचे अंतर कमी होईल. 8200 कोटींचा या प्रकल्पामुळे सोलापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे.

Advertisement

येत्या आठवड्यात रिंगरुटची अधिसूचना
सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड प्रकल्पातच शहराबाहेर रिंगरूट होणार आहे. विजापूर रस्त्यावरील हत्तूर ते हैदराबाद रस्त्यावरील तांदूळवाडी तसेच पुणे रस्त्यावरील केगाव ते हैदराबाद रस्त्यावरील तांदूळवाडी अशा एकूण 60 किलोमीटर रिंगरूटचा प्रस्ताव आहे. याची अधिसूचना येत्या आठवड्यात निघणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

जड वाहतूक होणार कमी

Advertisement

हत्तूर ते तांदूळवाडी 28 किमी, तसेच केगाव ते तांदूळवाडी 32 किमी असा हा रिंगरूट प्रस्तावित आहे. यासाठी दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावामधून भूसंपादन केले जाणार आहे. सध्या हत्तूर ते केगाव हा 21 किमी बायपास रस्ता पूर्ण झाला. या रिंगरूटमुळे शहरातील जड वाहतूक कमी होणार आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement