3 लाख कांदा शेतकऱ्यांना अनुदान वितरित होणार: कांदा उत्पादकांना जाहीर अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

3 लाख कांदा शेतकऱ्यांना अनुदान वितरित होणार: कांदा उत्पादकांना जाहीर अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Chief Minister, Deputy Chief Minister Launched The Announced Subsidy Distribution To Onion Farmers, Subsidy Will Be Distributed To Three Lakh Farmers

मुंबई4 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement

या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात 3 लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरित होणार आहे. उर्वरीत अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

कांदा अनुदानासाठी 10 कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे.

Advertisement

दहा कोटी पेक्षा जास्त कांदा अनुदानासाठी मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर,अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 हजार पर्यत सर्वांना अनुदान जमा होईल.आणि दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेल्या या 10 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची 10 हजार पर्यतची देयक आहेत त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे. आणि ज्या पात्र लाभार्थ्यांचे देयक 10 हजार रुपये पेक्षा जास्त आहे त्या लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.Source link

Advertisement