3 दिवसांत 15 जण कोरोना पाॅझिटीव्ह: मनपा आरोग्य विभाग सतर्क, टेस्ट सेंटर सुरू होणार, लसीसह उपाययोजनांना वेग


औरंगाबाद2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गवाढीचा धोका वाढला आहे. शहरात गत तीन दिवसांत १५ जणांचे अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत. त्यापैकी तेरा जण शहराच्या विविध भागातील आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

Advertisement

तीन वर्षांचा अनुभव पाहता मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातच कोरोनाची साथ अधिक वाढते. त्यामुळे मनपाने कोरोना प्रतिबंधात्मक लस, उपाययोजना व उपचार सुविधांसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

चिंता वाढतेय

Advertisement

कोरोना संसर्गाने संपूर्ण जगाला धडकी भरवली. तीन कोरोना लाटांपैकी पहिल्या दोन लाटांनी भारत देशात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित निघाले. छत्रपती संभाजीनगर शहर तर या दोन्ही कोरोना संसर्गाच्या लाटांमध्ये हिटलिस्टवर होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढू लागल्याने शहरासह जिल्ह्यातील आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

दुसरीकडे कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या एच-३ एन-२ संसर्गाचेही रुग्ण शहरात आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे नितांत गरजेचे झाले आहे.

Advertisement

लक्षणे दिसली तर करा चाचणी

मनपा प्रशासनाने शहरातील प्रमुख खासगी रुग्णालये व मनपाचे सर्व आरोग्य केंद्रांवर आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिेजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जो कुणी आजारी व्यक्त टेस्ट करण्यासाठी येईल, त्यांची टेस्ट केली जाणार असल्याचे पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. मागील दोन-तीन दिवसांत केलेल्या अ‍ॅन्टिजेन व आरटीपीसीआर टेस्टमधून पंधरा जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

Advertisement

यातील दोन केसेस या ग्रामीण भागातील असून तेरा बाधित हे शहराच्या विविध भागांतील आहेत. संसर्गवाढीचा धोका लक्षात घेत पालिकेने मेल्ट्रॉन रुग्णालयातील उपचारसुविधा सज्ज ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगसाठी स्वतंत्र टीम कामाला लावली जाणार आहे. मास्क लावण्याचे आवाहन नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

कोरोना, एच-3 एन-2 ची लक्षणे सारखीच

Advertisement

कोरोना, एच-3 एन-3 आणि स्वाइन फ्ल्यू या तिन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. सर्दी, ताप, खोकला, श्‍वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोरोना टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. यामुळे संसर्गवाढीचा धोका कमी करता येऊ शकेल.

तिन्ही आजारांसाठी एकच आरटीपीसीआर

Advertisement

विशेष म्हणजे, संबंधित तिन्ही आजारांच्या बाधितांसाठी एकच आरटीपीसीआर टेस्ट आहे. या टेस्टद्वारे घाटीतील लॅबमध्ये कोरोना, एच-3 एन-2 आणिस्वाइन फ्ल्यू या आजारांची एकाचवेळी टेस्ट केली जात असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement