नाशिक19 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
आदिवासी संस्कृती खूप संपन्न आणि समृद्ध आहे. पाककृती, हस्तकला, बांबूकला, चित्रकला, औषधे यांनी आदिवासी समाज समृद्ध आहे. त्यांच्या याच कलेचा रोजगार निर्मितीसाठी उत्तमप्रकारे वापर करता येऊ शकतो. याचाच विचार करून, आदिवासी बांधवांना कायमस्वरूपी वस्तू विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी आणि रोजगारनिर्मिती व्हावी या हेतूने आदिवासी विकास विभाग ‘आदिहाट’ची सुरुवात येत्या प्रजासत्ताक दिनापासून करत आहे. ‘आदिहाट” हा आदिवासी विकास आयुक्तालय तसेच सर्व अपर आयुक्त कार्यालये आणि प्रकल्प कार्यालयांच्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये विविध कलाकुसरीच्या वस्तू, आदिवासी संस्कृतीशी निगडित साहित्य, वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉल असतील. यापूर्वी विविध ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनात आदिवासी बचत गटांनी सहभाग घेतला आहे. पण “आदिहाट’च्या माध्यमातून कायम स्वरुपी हक्काची विक्रीव्यवस्था उपलब्ध होणार आहे.