इजिप्ट मध्ये उघडण्यात आल्या २५०० वर्षांपूर्वी पुरलेल्या पुरातन मम्मी

Egyptian Mummy
Image Source: Google Images

इजिप्ट मधील पुरातत्वशास्त्रज्ञांच्या व्हिडिओने थेट प्रेक्षकांसमोर प्राचीन मम्मीचे कॉफीन उघडल्यामुळे जगभरातील लोकांना आकर्षित केले. या विडीओ मध्ये बरेच जन कॉफीन उघडताना मम्मींचे फोटो काढताना दाखवले आहेत.

शनिवारी या सीलबंद पेट्या उघडल्या आणि त्यात सुमारे २५०० वर्षांपूर्वी पुरलेल्या पुरातन इजिप्शियन पुजारी यांचे देह होते.
इजिप्तच्या पर्यटन व पुरातन खाते म्हणाल्या प्रमाणे साक्काराच्या पुरातत्व क्षेत्रात दफन विहिरींमध्ये ५९ लाकडी शवपेटी सापडल्या आहेत.

Advertisement

पर्यटन मंत्री यांनी स्पष्ट केले की सुरुवातीला तीन विहिरींमध्ये १३ कॉफीन सापडल्या, त्यानंतर ३ आठवड्यांनी १२ मीटर(४० फीट ) खाली आणखीन १४ कॉफीन मिळाल्या. असे करत एकूण ५९ कॉफीन सापडल्या.

या व्यतिरिक्त अजून अज्ञात कॉफीन तिथे दफन असू शकतात. या कॉफीनमधे जुन्या काळातील पुजारी आणि काही थोर माणसे यांचे शव आहेत.

Advertisement

या कॉफीन गिझा मध्ये काम चालू असलेल्या ग्रँड इजिप्शियन म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी जातील. या सोबतच अजून २८ पुतळे ‘गॉड अॉफ डेथ’ चे आणि ‘नेफरटम’ देवतेचा ब्राँजचा पुतळा तिथे सापडला आहे.

तज्ञांनी तिथे काम सुरू ठेवले आहे. इजिप्ट आशा व्यक्त करते की येणाऱ्या दिवसात अजून बऱ्याच गोष्टींचे खुलासे होतील.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here