232 दिवसांनी अचानक प्रकट झाले परमबीर: गुन्हे शाखेच्या कार्यालयात जाऊन नोंदवला जबाब, सुप्रीम कोर्टातून मिळाला आहे अटकेपासून दिलासा


Advertisement

मुंबई4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

232 दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे डीजी होमगार्ड परमबीर सिंह गुरुवारी अचानक मुंबईत प्रकट झाले. त्यांनी प्रथम गुन्हे शाखेचे कार्यालय गाठून डीसीपी नीलोत्पल यांच्यासमोर जबाब नोंदवला. सिंह यांच्याविरुद्ध गोरेगावमध्ये दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पथक करत आहे. याप्रकरणी सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते, काही दिवसांपूर्वी त्यांना फरार घोषितही करण्यात आले होते.

Advertisement

बुधवारी चंदीगडमध्ये फोन ऑन झाला
बुधवारी चंदीगडमध्ये अचानक त्यांचा फोन ऑन झाला होता. तेव्हापासून परमबीर लवकरच मुंबई पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यापूर्वी परमबीर सिंह यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती.

त्यावेळी त्यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले होते की, परमबीर सिंह यांना या संपूर्ण प्रकरणात गोवले जात आहे. ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी भ्रष्ट कारभारासाठी शिक्षा केली तेच अधिकारी आज तक्रारदार बनले आहेत. परमबीर यांच्या जीवाला मुंबईत धोका आहे, त्यामुळे ते शहराबाहेर असल्याचेही कोर्टात त्यांच्या वकिलाने सांगितले होते. त्यांच्यावर आतापर्यंत ५ गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

मुंबई न्यायालयाने फरार घोषित केले होते
यापूर्वी, मुंबई न्यायालयाने परमबीर सिंह यांना फरार गुन्हेगार घोषित करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आता त्यांना वाँटेड आरोपी घोषित करू शकतात आणि प्रसारमाध्यमांसह संभाव्य सर्व ठिकाणी त्यांना फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. नियमांनुसार ३० दिवसांच्या आत ते कायद्यासमोर आले नाहीत, तर मुंबई पोलिस त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतील.

पोलिसांचे पथक अनेकवेळा चंदीगडला गेले
याआधी गृह विभागाने परमबीर बेपत्ता झाल्याची माहिती इंटेलिजन्स ब्युरोलाही दिली होती. विशेष म्हणजे परमबीर हे प्रकृतीच्या कारणास्तव रजेवर गेल्यानंतर मे महिन्यापासून बेपत्ता होते. गृहविभागाने सिंह यांना त्यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी अनेक पत्रे पाठवली आणि त्यांच्या ठावठिकाणाविषयी चौकशी करण्यात आली, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Advertisement

गेल्या महिन्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले होते की, आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी ते अखिल भारतीय सेवा नियमांच्या तरतुदींचा विचार करत आहेत.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here