20 वर्षीय तरुणीचा विनयभंग: मैत्रिणी सोबत चाकण ते पुणे असा बस प्रवास करत असताना घडला प्रकार; एकास अटक

20 वर्षीय तरुणीचा विनयभंग: मैत्रिणी सोबत चाकण ते पुणे असा बस प्रवास करत असताना घडला प्रकार; एकास अटक


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

चाकणवरून पुण्याच्या दिशेने बस प्रवास करत असलेल्या 20 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे .प्रभात कुमार तिवारी (वय -26, रा. – चाकण ,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Advertisement

याप्रकरणी वीस वर्षीय तरुणीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित तरूणी तिच्या मैत्रिणी सोबत बस मधून भोसरी ते पुणे स्टेशन असा प्रवास करत होती. त्यावेळी बस मध्ये तिच्या मागे उभा राहून, आरोपी तरुणाने जाणून बुजून तिच्या शरीराला आक्षेपार्ह स्पर्श करून तरुणीच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य प्रभात कुमार तिवारी या तरुणानी केले.तसेच तरुणी पुणे स्टेशन येथे उतरल्यानंतर तिच्या मागे जाऊन तिचा पाठलाग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही जाधव पुढील तपास करत आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Advertisement

लोहगाव परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा घराबाहेर येताना- जाताना पाठलाग करून तसेच ‘मला तू आवडतेस, माझ्याशी फ्रेंडशिप कर’ असे बोलून जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तुषार सोमनाथ गायकवाड (वय -२०, रा.पुणे) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात पीडित मुलीने आरोपी तुषार गायकवाड, त्याचे वडील सोमनाथ गायकवाड ,आई अनिता गायकवाड आणि भाऊ अभिषेक गायकवाड यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आरोपी तुषार गायकवाड यानी मुलीस ‘तुझ्या आईकडे कामावर सोडतो ‘असे म्हणून तिला गाडीवर बसून जबरदस्तीने आळंदीचे दिशेने घेऊन जात होता. त्यावेळी तिने आरडाओरड केल्याने आरोपीनी तिला परत घरी सोडले .त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी सदर झालेल्या प्रकाराबाबत मुलीची चुलती जाब विचारण्यासाठी तरुणाकडे गेली असता, आरोपी व त्याच्या कुटुंबीयांनी संगणमत करून तक्रारदार हीची आजी ,आत्या आणि चुलती यांना मारहाण केली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस पुढील तपास करत आहे.

Advertisement



Source link

Advertisement