20 रुपयांत दवाखाने सुरू करून चालवणे फार जिकीरीचे: ‘इन्स्टा’, रिल्सच्या जमान्यात सामाजिकता दिसणे अवघड – खासदार महात्मे


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

वर्तमान काळ फार गतिमान आहे. वाढत्या विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढल्याने माणसातील संवेदनशीलता कमी झाली आहे. एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा व्हाॅट्सअ‌ॅप व फेसबुक सारखी माध्यमे वापरली जातात. त्यामुळे आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी ही मानवी भावना हरवत आहे. परिणामी, इन्स्टा आणि रिल्सच्या जमान्यात सामाजिकता दिसणे अवघड झाले. मात्र, डॉ. रोहित बोरकर यांनी जपलेली सामजिकता तसेच सकारात्मक दिशेने टाकलेले पाऊल समाजाला पुढे घेऊन जाणारे आहे, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार पद्मश्री विकास महात्मे यांनी व्यक्त केले.

Advertisement

सत्यशिव ग्लोबल फाऊंडेशन, अहिल्या आरोग्य हेल्पलाईन व फस्ट ऐड डॉक्टर असोसिएशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित महा-आरोग्य सन्मान पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

पुढे बोलताना खा. डॉ.महात्मे म्हणाले की, पुणे सारख्या महानगरात केवळ एक रूपये, दहा रूपये आणि २० रूपयात दवाखाने सुरू करून ते यशस्वीपणे चालवणे, हे फार जिकीरीचे काम सत्यशिव ग्लोबल फाऊंडेशन, अहिल्या आरोग्य हेल्पलाईन व फस्ट ऐड डॉक्टर असोसिएशन अतिशय चांगल्या पद्धतीने करीत आहेत. त्यांच्या कामात चिकाटी, मेहनत आणि सातत्य आहे. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत २५ दवाखाने सुरू केलेत. भविष्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे, हि फार मोठी गोष्ट आहे.

Advertisement

कार्यक्रमाचे औचित्य साधून याप्रसंगी संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या ‘आरोग्यदूत’ पुस्तक व ‘संघर्षाची पाच वर्ष’ या लघुपटाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जोपासून काम करताना अडचणी येतात. मात्र, त्यावर जिद्दीने मात करता येते. कामात सातत्य व बोलण्यात गोडवा असला की, बरीच कामे मार्गी लागतात. जोपर्यंत लोक तुमच्या पाठीशी उभे राहात नाहीत, तोपर्यंत तुमची समाजाशी नाळ जोडली जात नाही. म्हणून संयमाने प्रयत्न करीत समाज तुमच्या कामाचे कौतुक केल्याशिवाय राहात नाही.सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता कमी होत असली तरी डॉ. बोरकर सारखे तरूण आहेत, म्हणून उद्याचा काळ उज्ज्वल वाटतो, अशी भावना डॉ. विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केली.

Advertisement



Source link

Advertisement