Virat Kohli Video : सध्या आयपीएल 2022 अंतिम टप्प्यात आली आहे. या हंगामत खेळाडून विविध रेकॉर्ड करत आहेत. रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनेही नवा विक्रम केला आहे. त्याने आयपीएलमध्ये 6 हजार 500 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये साडेसहा हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरलाय. मात्र, कालच्या पंजाब विरुद्धच्या सामन्यात विराट 20 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कोहलीने आकाशाकडे बघत आपला राग व्यक्त केला. कोहली आऊट झाल्यानंतरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पंजाब विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली 20 धावा करुन बाद केला. आऊट झाल्यानंतर कोहलीने आकाशाकडे पाहत आपला राग व्यक्त केला. त्यानंतरचा विराटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयपीएल 2022 मध्ये कोहली आतापर्यंत काही खास खेळी करु शकलेला नाही. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 210 धावांचे लक्ष्य रॉयल चँलेजर्स बंगळुरुसमोर ठेवले होते. प्रत्युत्तरात बंगळुरुच्या खेळाडूंना केवळ 155 धावा करता आल्या. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सलामीला आले होत. यादरम्यान कोहली 14 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 20 धावा करुन बाद झाला. आऊट झाल्यानंतर कोहलीने आकाशाकडे पाहिले आणि तो काहीतरी बोलत असल्याचे दिसले. मैदानाच्या बाहेर आल्यानंतर त्याने संतापही व्यक्त केला आहे.
Nah man. He was litteraly begging for some luck.😭💔
Virat clearly saying: why always me pic.twitter.com/mG3x3rJ5m6Advertisement
— 101 Gram (@VishaI_18) May 13, 2022
विशेष म्हणजे हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोहली शून्यावर बाद झाला होता. तत्पूर्वी, तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 30 धावांवर बाद झाला होता. कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 9 धावा केल्य होत्या. तर लखनौ आणि हैदराबादविरुद्ध तो शून्य धावांवर बाद झाला होता. त्याचबरोबर मुंबईविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 48 आणि दिल्लीविरुद्ध एक धाव करुन तो बाद झाला होता. आयपीएल 2022 मध्ये कोहली अद्याप काही समाधानकारक कामगिरी केली नाही. मात्र, त्याच्या नावावर एक विक्रम झाला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 6 हजार 500 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: